1 minute reading time
(93 words)
[Lokshahi Marathi]विलीनीकरणासाठी कुणाचाही संपर्क नाही, शरद पवारांकडे कुठलाही प्रस्ताव आला नाही
देशातील प्रादेशिक राजकीय पक्ष काँग्रेस पक्षात विलीन करण्यात यावे का?, अशा प्रकारची चर्चा सध्या राजकीय वर्तुळात चर्चा सुरू आहे. या चर्चेत महाराष्ट्रातील राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार पक्षाच्या नावाचाही उल्लेख केला जात आहे. यासंदर्भात राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार पक्षाच्या खासदार सुप्रिया सुळे यांना विचारलं असता त्यांनी, "मला याबद्दल कोणतीही माहिती नाही. ही माहिती मला तुमच्याकडूनच समजली. मला आणि पवार साहेबांना याबाबत काहीही माहिती नाही," असं त्यांनी स्पष्ट केलं. देश आर्थिक संकटातून जात असताना पंतप्रधानांनी सर्व राजकीय पक्षांना एकत्र बोलावून देशाच्या आर्थिक परिस्थितीवर सविस्तर चर्चा करावी, अशी आमच्या पक्षाची सातत्याने मागणी असल्याचंही त्यांनी सांगितलं.

