[Prabhat ]‘UPSC चा पेपर फुटत नाही, पण नीटचा पेपर फुटतो’ ; सुप्रिया सुळेंचं विधान
Supriya Sule : देशात UPSC चा पेपर कधी फुटत नाही, मग नीटचा पेपर कसा फुटतो? असा सवाल उपस्थित करत शरद पवार गटाच्या खासदार सुप्रिया सुळेंनी केंद्र सरकारला नीट पेपरफुटी प्रकरणी जाब विचारला आहे. नीट पेपरफुटीची पारदर्शकपणे चौकशी झाली पाहिजे, अशी मागणीही सुळेंनी केली आहे.
आज १ अॅागस्ट लोकशाहीर अण्णाभाऊ साठे यांची जयंती असल्याने राज्यभरात विविध कार्यक्रमांचं आयोजन करण्यात आलं आहे. खासदार सुप्रिया सुळे यांनी मुंबईत अण्णाभाऊ साठेंच्या जयंतीनिमित्त त्यांच्या प्रतिमेला अभिवादन केलं. त्यानंतर त्यांनी माध्यमांसोबत साधलेल्या संवाद वरील विधान केलं.
…हे धक्कादायक आहे : सुप्रिया सुळे"नीट प्रकरणाची पारदर्शक चौकशी सुरू आहे. यासाठी एक एसआयटी स्थापन करा. सर्व पक्षीय बैठक किंवा संयुक्त संसदीय समिती स्थापन करता येते. भारताचे शिक्षण पुढे कसं असावं? UPSC ची परीक्षा होते. त्याचा पेपर कधी फुटतो का? UPSC चा पेपर फुटत नाही. पण नीटचा पेपर फुटतो. खरंतर अनेक कोचिंग क्लासेस असे आहेत, त्यांचे आयपीओ येत आहेत. ऐवढा पैसा त्यांच्याकडे झाला आहे. ते मोठा व्यवसायक करून त्यांचा सार्वजनिक कंपन्यांच्या यादीत समावेश होत आहे. हे धक्कादायक आहे." असं सुप्रिया सुळेंनी म्हटलं आहे.
पुढं बोलताना त्या म्हणाल्या, "शिक्षणाचं बाजारीकरण झालं आहे. आता शिक्षण व्यवस्थेवर आम्ही चर्चा करायची नाही, तर कोणी करायची. संसद भवन त्याच्यासाठीच आहे. त्यामुळे राजकारण बाजूला ठेवून तरुणांना न्याय मिळावा, परीक्षा पारदर्शक व्हावी."
परीक्षा सुधारणा विधेयकावर आक्षेप (Supriya Sule)
संसदेच्या पावसाळी अधिवेशनाचा पहिला आठवडा पाण्यात गेल्यानंतर दुसऱ्या आठवड्यात विद्यार्थ्यी आंदोलनाविषयी सत्ताधारी आणि विरोधकांनी भाष्य केलं. मात्र संसदेत विद्यार्थ्यांच्या आंदोलनाला घेऊन विरोधकांनी आक्रमकतेचा सूर आवळ्याने त्याचा लोकसभा आणि राज्यसभेतील कामकाजावर परिणाम झाल्याचा आरोप करण्यात आला. नीट पेपरफुटीच्या पार्श्वभूमीवर परीक्षा सुधारणा विधेयक लोकसभा आणि राज्यसभेत मांडण्यात आलं. ते मंजूर करण्यात आलं आहे. मात्र, या विधेकावर सुप्रिया सुळेंनी आक्षेप घेतला असून विधेयक मान्य नसल्याचं म्हटलं आहे.
….तर पालक म्हणूनही मी समाधानी नाही.
याविषयी बोलताना सुप्रिया सुळे म्हणाल्या, " आता बिल आणलं, त्यात मी समाधानी नाही. राष्ट्रवादी काँग्रेसही नाही. इंडिया आघाडी देखील नाही. राजकारणी नव्हे, तर पालक म्हणूनही मी समाधानी नाही. या प्रकरणात शिक्षा होऊन फायदा नाही. तुम्ही पेपरफुटी थांबवल्या पाहिजे. एखाद्याने तंत्रज्ञानाचा चुकीचा वापर करून पेपर फोडला, तर त्याच्यावर प्रशासन कोणाचं असेल. हे प्रकरण सरकारने गांभीर्याने घ्यावे. पहलगामवेळी देशहितासाठी एक झाले. विरोधी पक्षाला विश्वासात घ्यावे."

