2 minutes reading time (364 words)

[ABP MAJHA]प्रकृतीची काळजी घ्या, आपण सर्वजण एकत्र लढूयात

प्रकृतीची काळजी घ्या, आपण सर्वजण एकत्र लढूयात

खासदार सुप्रिया सुळेंनी साधला धनंजय देशमुखांशी संवाद

 MP Supriya Sule : संतोष देशमुख हत्या प्रकरणात (Santosh Deshmukh Murder Case) न्याय मिळावा, या मागणीसाठी मस्साजोगच्या (Massajog) ग्रामस्थांनी आजपासून अन्नत्याग आंदोलन सुरु केलं आहे. मस्साजोग गावात सुरु असलेल्या या अन्नत्याग आंदोलनाची माहिती घेण्यासाठी राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार गटाच्या खासदार सुप्रिया सुळे (MP Supriya Sule) यांनी धनंजय देशमुख यांच्याशी फोनवरुन संवाद साधला. तुमच्या प्रकृतीची काळजी घ्या, विशेषतः तुमच्या आईची काळजी घ्या असे सुळे म्हणाल्या. सुप्रिया सुळे यांच्याकडून देशमुख कुटुंबाच्या आरोग्याची देखील विचारपूस करण्यात आली.

वैभवीची बारावी बोर्डाची परीक्षा सुरु आहे ,तिच्या करीअरचा देकील महत्त्वाचा प्रश्न आहे. आपण सर्व एकत्र लढूयात असा शब्द सुप्रिया सुळे यांनी देशमुख कुटुंबाला दिला. मी याबाबत मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यासोबत बोलणार आहे, या प्रकरणात संवेदनशीलता दाखवावी असे सुळे म्हणाल्या.

संतोष देशमुख हत्या प्रकरणातील सर्व आरोपींना अटक करावी. आरोपींना शिक्षा देऊन कुटुंबाला न्याय द्यावा या मागणीसाठी ग्रामस्थांनी एल्गार पुकारलाय. मसाजोगचे सरपंच संतोष देशमुख यांच्या हत्येला 77 दिवस उलटून गेले आहेत. या प्रकरणात अद्याप कृष्णा आंधळे हा आरोपी फरार आहे. सकाळी 10 वाजता आंदोलनाला सुरुवात झाली. (Beed) याप्रकरणी केज पोलिसांनी सुरुवातीला केलेला तपास असमाधानकारक असल्याचं धनंजय देशमुख यांनी एबीपी माझाला सांगितलं. अन्नत्याग आंदोलनापूर्वी झालेल्या पोलीस अधीक्षकांसोबत झालेल्या चर्चेत अनपेक्षित बाब उघड झाल्याचं त्यांनी सांगितलं. केज पोलीस एसपींच्या कानावर तपास काय झाला हे घालत नसल्याचं धनंजय देशमुख म्हणाले. पोलिसांनी आरोपींना अभय दिल्याचा आरोप ही धनंजय देशमुख यांनी केला. या संपूर्ण प्रकरणात पोलिसांच्या तपासाच्या कार्यशैलीवर पहिल्यापासून संशय व्यक्त करण्यात येत आहे . आधी प्रकरणात काय तपास चालू आहे हे कुटुंबीयांना कळवत नाहीत अशी तक्रार होती. त्यानंतर आरोपींना मदत केल्याचा आरोप करण्यात आला आहे.

कृष्णा आंधळेला अटक झाली पाहिजे ही प्रमुख मागणी आहे.

कृष्णा आंधळ्याच्या समर्थक अजूनही त्याचे स्टेटस ठेवतात, त्यांच्यावर कारवाई केली जात नाही. ते प्राणघात हल्ले करत आहेत. त्यामुळे त्यांना अटक झाली पाहिजे.

सरकारी वकिलांची नियुक्ती करावी.

हे प्रकरण फास्टट्रॅक न्यायालयात अंडरट्रायल चालायला हवं.

...

 Santosh Deshmukh Murder Case MP Supriya Sule calls Dhananjay Deshmukh to inquire about the food boycott movement in Massajog | प्रकृतीची काळजी घ्या, आपण सर्वजण एकत्र लढूयात, खासदार सुप्रिया सुळेंनी साधला धनंजय देशमुखांशी संवाद

संतोष देशमुख हत्या प्रकरणात न्याय मिळावा, या मागणीसाठी मस्साजोगच्या ग्रामस्थांनी आजपासून अन्नत्याग आंदोलन सुरु केलंय. या अन्नत्याग आंदोलनाची माहिती खासदार सुप्रिया सुळे यांनी घेतली.
[Navarashtra]“राजकारणी आणि साहित्यिक यांची लढाई…”
[TV9 Marathi]साहित्य संमेलनाच्या एवढ्या सुंदर कार्...