2 minutes reading time (360 words)

[Time Maharashtra]Supriya Sule यांची बिहारमधील निकालावर प्रतिक्रिया, ‘….आम्ही मान्य केलं पाहिजे’

Supriya Sule यांची बिहारमधील निकालावर प्रतिक्रिया, ‘….आम्ही मान्य केलं पाहिजे’

Supriya Sule on Bihar Election Result: राज्यात गेल्या काही दिवसांपासून संपूर्ण राज्याचे लक्ष लागून राहिले आहे. बिहार विधानसभा निवडणुकीचा निकाल शुक्रवारी जाहीर होत आहे. मतमोजणीचे कल पाहता भाजप आणि JDU यांच्या एनडीए आघाडीला (NDA) बहुमत मिळण्याची दाट शक्यता आहे. त्यामुळे साहजिकच या सगळ्याचा परिणाम राष्ट्रीय राजकारण आणि देशातील आगामी निवडणुकांवर पडणार. त्यामुळे अनेकजण या निकालाकडे अनेकांचे लक्ष लागलेले आहे. बिहारमध्ये एनडीए आघाडीला स्पष्ट बहुमत मिळताना दिसत असल्यामुळे संयुक्त जनता दल (JDU) आणि भाजपच्या कार्यकर्त्यांनी म्हणजेच NDA ने सेलिब्रेशनला सुरुवात केली आहे. या सगळ्या गदारोळात महाराष्ट्रात एक महत्त्वाची राजकीय घडामोड म्हणजे मुंबई येथे आयोजित पत्रकार परिषदेत सुप्रिया सुळे यांनी बिहारच्या निकालावर भाष्य केले आहे.

नितीश कुमार यांचं मनापासून अभिनंदन. त्यांच्या आघाडीने चांगलं काम केलं हे आम्ही मान्य केलं पाहिजे. एकतर्फी, इतक्या मोठ्या प्रमाणात जिंकतील असं मीडिया, सर्व्हेंना किंवा जिंकणाऱ्यांनाही वाटत आहे. आम्हाला याचा अभ्यास करावा लागेल. नितीश कुमार यांचा विजय आहे हे मान्य करावं लागेल, असं सुप्रिया सुळे यांनी आज माध्यमांशी बोलताना सांगितले आहे.

बिहारच्या लोकांनी नितीश कुमार यांच्यावर विश्वास दाखवला आहे. हे यश नितीश कुमार यांचं आहे. पूर्ण निकाल अजून यायचा आहे. आम्ही आत्मचिंतन केलं पाहिजे. आम्हाला आता बघायला पाहिजे की आमच्याकडून कोणत्या चुका होत आहे. एकतर्फी निकाल लागेल असं वाटत नाही. मतविभाजन कसे झाले याचा अभ्यास २ ते ३ दिवसात करु. यशाचे अनके बाप असतात, पण पराभवाला कोणी वाली नसतं. "राहुल गांधींनी प्रचंड मेहनत केली. राहुल स्टार प्रचार होते. राहुल गांधी यांच्या सभेनंतर फॉलो अप किती केले हे माहिती नाही. कार्यकर्त्यांनी किती काम केले माहिती नाही". 

...

Supriya Sule's Reaction To The Results In Bihar, '....we Should Accept It'

राज्यात गेल्या काही दिवसांपासून संपूर्ण राज्याचे लक्ष लागून राहिले आहे. बिहार विधानसभा निवडणुकीचा निकाल शुक्रवारी जाहीर होत आहे. मतमोजणीचे कल पाहता भाजप आणि JDU यांच्या एनडीए आघाडीला (NDA) बहुमत मिळण्याची दाट शक्यता आहे. त्यामुळे साहजिकच या सगळ्याचा परिणाम राष्ट्रीय राजकारण आणि देशातील आगामी निवडणुकांवर पडणार. त्यामुळे अनेकजण या निकालाकडे अनेकांचे लक्ष लागलेले आहे. बिहारमध्ये एनडीए आघाडीला स्पष्ट बहुमत मिळताना दिसत असल्यामुळे संयुक्त जनता दल (JDU) आणि भाजपच्या कार्यकर्त्यांनी म्हणजेच NDA ने सेलिब्रेशनला सुरुवात केली आहे. या सगळ्या गदारोळात महाराष्ट्रात एक महत्त्वाची राजकीय घडामोड म्हणजे मुंबई येथे आयोजित पत्रकार परिषदेत सुप्रिया सुळे यांनी बिहारच्या निकालावर भाष्य केले आहे.
[Prahaar]खासदार सुप्रिया सुळेंनी घेतली मुख्यमंत्र्...
[ZEE 24 TAAS]'....आम्ही मान्य केलं पाहिजे', सुप्रि...