1 minute reading time (86 words)

[Saam TV]सुप्रिया सुळे यांचा माध्यमांशी संवाद

सुप्रिया सुळे यांचा माध्यमांशी संवाद

सरपंच संतोष देशमुख हत्याकांडात धनंजय मुंडे यांचा निकटवर्तीय वाल्मिक कराड अडकल्यानंतर मुंडेंना कॅबिनेट मंत्रीपदाचा राजीनामा द्यावा लागला. मार्चच्या पहिल्या आठवड्यात मुंडेंनी राजीनामा दिला होता. त्यांच्या राजीनाम्याला आता तीन ते साडेतीन महिने होत आहेत. धनंजय मुंडे यांना एका प्रकरणात उच्च न्यायालयाने क्लीनचीट दिली आहे. त्यामुळे आता पुन्हा एकदा मुंडेंची मंत्रीपदी वर्णी लागण्याची चर्चा सुरु झाली आहे. यावरुन राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाने तीव्र संताप व्यक्त केला आहे. लोकांची घरं उद्ध्वस्त करणाऱ्या लोकांना निर्णय प्रक्रियेत पुन्हा येऊ देणार नाही, असा इशारा खासदार सुप्रिया सुळे यांनी दिला आहे. 

[Maharashtra Times]इतर राज्यांत महाराष्ट्राची प्रत...
[ABP MAJHA]दिल्लीतले खासदार थांबून थांबून विचारत ह...