2 minutes reading time (356 words)

[Maharashtra Times]पहलगाम दहशतवादी हल्ल्यात वडील गमावणाऱ्या आसावरी जगदाळे यांच्यासाठी सुप्रिया सुळे यांचं मोठं पाऊल

पहलगाम दहशतवादी हल्ल्यात वडील गमावणाऱ्या आसावरी जगदाळे यांच्यासाठी सुप्रिया सुळे यांचं मोठं पाऊल

अभिजीत दराडे, पुणे : सुप्रिया सुळे यांनी पहलगामवर झालेल्या हल्ल्याचा निषेध केलाय. यासोबतच त्यांनी म्हटले की, मदत आणि नोकरी मिळाली पाहिजे. त्यांनी मदत केली त्यासाठी सरकारचे आभार. आसावरी जगदाळेला पुणे महापालिकेत नोकरी द्यावी, अशी मागणी सुप्रिया सुळे यांनी केलीये. हेच नाही तर आसावरीच्या नोकरीसाठी आपण एकनाथ शिंदे यांना पत्र लिहिणार असल्याचेही सुप्रिया सुळे यांनी म्हटले. भारत म्हणून एक आहोत. सरकारच्या विरोधात १० दिवस काहीही बोलार नसल्याचे ठरवले होते. एक सेशन बोलून सविस्तर चर्चा व्हावी, असेही सुप्रिया सुळे यांनी म्हटले.

सुप्रिया सुळे यांनी पुढे म्हटले की, होम मिनिस्ट्रीच्या कमिटीवर मी आहे. ही कमिटी आणि मी हल्ला झाला त्या ठिकाणी आणि बाकी ठिकाणी सुरक्षेसंदर्भात माहिती घायला जाणार होतो. मात्र, हे सगळं घडलं आणि आमचा दौरा रद्द केला. पुढे पुरंदर विमातळाबद्दल देखील सुप्रिया सुळे या बोलल्या आहेत. त्यांनी म्हटले की, मी पुरंदरला जाणार आहे. भूसंपादन करताना विचार करावा. कोणाचाही विरोध नाही. मात्र. नीट भूसंपादन कराव एवढ सगळ्याच म्हणणं आहे.

पुरंदर विमानतळ आणि पुणे रिंग रोड यासंदर्भात भूसंपादन करताना विचार करा. कोणाच्या पोटावर पाय येऊ देऊ नका, असे स्पष्ट सुप्रिया सुळे यांनी केले. सुप्रिया सुळे यांनी पहलगाम हल्ल्यानंतर एक सेशन बोलून सविस्तर चर्चा व्हावी, अशी मोठी मागणी केली आहे. पहलगाम हल्ल्यानंतर पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी देखील विदेशी दाैरे रद्द केले आहेत. पहलगान हल्ल्यानंतर देशात एक संतापाचे वातावरण बघायला मिळतंय.

पहलगाम हल्ल्याचा बदल घेण्याची मागणी लोकांकडून केली जात आहे. काश्मीरमध्ये लष्कराकडून सर्च ऑपरेशन राबवले जातंय. बिहारमध्ये बोलताना मोदींनी थेट मोठे संकेत दिले. दहशतवादाविरोधात आक्रमक भूमिका घेताना पंतप्रधान नरेंद्र मोदी हे दिसले. पहगामवरील हल्ल्यानंतर राज्यातील प्रवाशांना सुरक्षित परत आणण्यासाठी विमानाची व्यवस्था करण्यात आली होती. एकनाथ शिंदे हे हल्ल्यानंतर जम्मू काश्मीरकडे रवाना झाले होते. 

...

Mp Supriya Sule Has Made Big Demand To Deputy Chief Minister Eknath Shinde : पहलगाम दहशतवादी हल्ल्यात वडील गमावणाऱ्या आसावरी जगदाळे यांच्यासाठी सुप्रिया सुळे यांचं मोठं पाऊल | Maharashtra Times

Supriya Sule News : सुप्रिया सुळे यांनी पहलगाम हल्ल्याचा निषेध केला आहे. त्यांनी पीडितांना मदत आणि आसावरीला नोकरी देण्याची मागणी केली. यासाठी त्या मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना पत्र लिहिणार आहेत. सुळे यांनी पुरंदर विमानतळाच्या भूसंपादनाबाबत विचारपूर्वक निर्णय घेण्यास सांगितले आहे. पहलगाम हल्ल्यामुळे दौरा रद्द झाल्याचे त्यांनी सांगितले. या हल्ल्यासंदर्भात सविस्तर चर्चा करण्याची मागणी सुप्रिया सुळे यांनी केली आहे.
[Etv Bharat]पुरंदर तालुक्यात तुमची जमीन!; सुप्रिया...
[Etv Bharat]पहलगाम हल्ल्यासंदर्भात सुप्रिया सुळेंन...