1 minute reading time
(77 words)
[Saam TV]ट्विट करत सुप्रिया सुळेंनी मतदारांचे मानले आभार
लोकसभा निवडणुकीत संपूर्ण देशाचे लक्ष लागून असलेल्या बारामती लोकसभा मतदारसंघात खासदार सुप्रिया सुळे यांनी आपल्या वाहिनी आणि अजित पवार यांच्या पत्नी सुनेत्रा पवार यांचा पराभव करत सलग चौथ्यांदा विजय मिळवला. अजित पवार यांनी भाजपला साथ देत राष्ट्रवादीत फुट पडली होती. त्यामुळे सुप्रिया सुळे यांच्यासमोर मोठे आव्हान होते. पण शरद पवार साहेबांचा अनुभव आणि सुप्रिया सुळे यांचा मतदारसंघात असलेला संपर्क यामुळे सुप्रिया सुळे यांनी बारामतीत दणदणीत विजय मिळवला आहे. विजयानंतर सुप्रिया सुळे यांनी सर्वांचे आभार मानले आहेत.

