1 minute reading time
(95 words)
[ABP MAJHA]Supriya Sule PC | NCP LIVe | EVM Issue | Abp Majha LIVE
राज्याचे मुख्यमंत्री आणि दोन्ही उपमुख्यमंत्र्यांचा शपथविधी गुरूवारी पार पडला. त्यानंतर लगेच दुसऱ्या दिवशी राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष आणि राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांना दिल्लीच्या बेनामी न्यायाधिकरणाने (Prevention of Benami Property Transactions Appellate Tribunal) मोठा दिलासा दिल्याची माहिती समोर आली. 2021च्या बेनामी प्रकरणात प्राप्तिकर विभागाने जप्त केलेल्या त्यांच्या सर्व मालमत्ता काल(शुक्रवारी) मंजूर करण्यात आल्या आहेत. दिल्लीतील बेनामी मालमत्ता व्यवहार अपीलीय न्यायाधिकरणाने हा निर्णय देत अजित पवार आणि त्यांच्या कुटुंबाविरुद्ध बेनामी मालमत्तेच्या मालकीचे आरोप फेटाळून लावले आहेत. त्यानंतर चर्चांना उधाण आलं आहे. त्यावर आज शरद पवारांच्या राष्ट्रवादी काँग्रेस नेत्या आणि खासदार सुप्रिया सुळे यांनी भाष्य केलं आहे.

