1 minute reading time (101 words)

[TV9 Marathi]मविआच्या आगामी सरकारमध्ये पुण्यातील काहीजण मंत्रिपदावर - सुप्रिया सुळे

मविआच्या आगामी सरकारमध्ये पुण्यातील काहीजण मंत्रिपदावर - सुप्रिया सुळे

 लोकसभा निवडणुकीत महाराष्ट्रात चांगले यश मिळाल्यानंतर आगामी विधानसभा निवडणुका देखील आपण बहुमताने जिंकू असा विश्वास महाविकास आघाडीच्या नेत्यांमध्ये दिसत आहे. विधानसभा निवडणुकांसाठी जागा वाटपाच्या चर्चा सध्या महाविकास आघाडीमध्ये सुरू आहेत.

तर पुण्यामधून महाविकास आघाडीचे घटक पक्ष असलेल्या काँग्रेस, राष्ट्रवादी शरद पवार पक्ष आणि शिवसेना ठाकरे गटामधून मोठ्या प्रमाणात इच्छुक पाहायला मिळत आहेत. या इच्छुकांमध्ये तिकीट मिळवण्यासाठी चढाओढ सुरू असतानाच राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी शरदचंद्र पवार पक्षाच्या खासदार सुप्रिया सुळे(Supriya Sule) यांनी राज्यात महाविकास आघाडीचे सरकार येणार असल्याचा विश्वास व्यक्त करत, पुण्यातील काही नेते मंत्री झालेले दिसतीलं असं विधान केलं आहे. यामुळे महाविकास आघाडीच्या नेत्यांमध्ये आता अधिकच उत्साही वातावरण बघायला मिळत आहे.

[LetsUpp Marathi]MPSC च्या विद्यार्थ्यांचं आंदोलन,...
[Lokshahi Marathi]सुप्रिया सुळे यांची पत्रकार परिष...