[Lokshahi]धक्कादायक! वसईत तरुणीची निर्घृण हत्या
सुप्रिया सुळे म्हणाल्या...
मुंबईतील वसईमध्ये भर रस्त्यात आज एका प्रियकराने आपल्या प्रेयसीवर लोखंडी पान्याने वार करुन तिची हत्या केली. या घटनेनंतर परिसरात भीतीचे वातावरण पसरले आहे. हत्येनंतर आरोपी घटनास्थळावरच बसून राहिला. त्यानंतर काही वेळात घटनास्थळी पोलीस दाखल झाले. त्यानंतर आरोपीला अटक करण्यात आली. हल्लेखोर आणि पीडितेची अद्याप ओळख पटली नाही. पोलिस या प्रकरणी पुढील कारवाई करत आहे. याच पार्श्वभूमीवर सुप्रिया सुळे यांनी सोशल मीडियावर पोस्ट शेअर केली आहे.
तरुणी रस्त्यावर रक्ताच्या थारोळ्यात पडलेली होती. तीचा जागीच मृत्यू झाला. या घटनेनंतर पोलिस घटनास्थळी दाखल झाले. पोलिसांनी तरुणीचा मृतदेह ताब्यात घेतला. या प्रकरणी पुढील तपासणी सुरु आहे.
सुप्रिया सुळे पोस्ट शेअर करत म्हणाल्या की, वसई येथे भररस्त्यात एका तरुणाने तरुणीचा निर्घृण खून केला. हि घटना घडत असताना लोक व्हिडिओ करण्यात मग्न होते परंतु त्या तरुणीला वाचविण्याचा प्रयत्न गर्दीकडून झाला नाही. गर्दीची हि असंवेदनशीलता काळजीचा विषय आहे. आणखी एक गंभीर बाब म्हणजे या तरुणाविषयी मुलीच्या आई वडीलांनी पोलीसांत तक्रार दिली होती. परंतु त्याची पुरेशी दखल घेतली गेली नाही. पोलीसांनी याकडे वेळीच लक्ष दिले असते तर त्या मुलीचे प्राण वाचले असते. या दुर्दैवी तरुणीला भावपूर्ण श्रद्धांजली. तिचा खून करणाऱ्या तरुणावर फास्ट्रट्रॅक कोर्टात खटला चालवून कठोरात कठोर शिक्षा होणे गरजेचे आहे. याशिवाय मुलीच्या आई वडीलांनी दिलेल्या तक्रारीचा दखल का घेतली गेली नाही याचीही सखोल चौकशी व्हायला हवी, अशी आमची मागणी आहे. राज्यात गृहखाते निष्क्रिय असल्यानेच संपूर्ण यंत्रणा सुस्त झाली असून सर्वसामान्य माणसाला न्याय मिळणे दुरापास्त झाले आहे.
वसई येथे भररस्त्यात एका तरुणाने तरुणीचा निर्घृण खून केला. हि घटना घडत असताना लोक व्हिडिओ करण्यात मग्न होते परंतु त्या तरुणीला वाचविण्याचा प्रयत्न गर्दीकडून झाला नाही. गर्दीची हि असंवेदनशीलता काळजीचा विषय आहे. आणखी एक गंभीर बाब म्हणजे या तरुणाविषयी मुलीच्या आई वडीलांनी पोलीसांत…
— Supriya Sule (@supriya_sule) June 18, 2024

