2 minutes reading time (422 words)

[My Mahanagar]लाडकी बहीण योजनेत 4,800 कोटींचा घोटाळा, पुरूषांनी घेतला लाभ, सुप्रिया सुळेंचे आरोप

लाडकी बहीण योजनेत 4,800 कोटींचा घोटाळा, पुरूषांनी घेतला लाभ, सुप्रिया सुळेंचे आरोप

Mumbai : लाडकी बहीण योजनेत तब्बल 4800 कोटींचा घोटाळा झाला आहे असा आरोप राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाच्या खासदार सुप्रिया सुळे यांनी केला आहे. त्यांच्या या आरोपांमुळे एकच खळबळ उडाली आहे. इतक्या चाळण्या असताना पुरूष लाभार्थी या योजनेत घुसलेच कसे असा थेट सवाल त्यांनी विचारला. लाडकी बहीण योजनेत भ्रष्टाचार झाला आहे. पण त्यासाठी मी या खात्याच्या मंत्री असलेल्या आदिती तटकर यांच्यावर आरोप करणार नाही. मी कोणावरही खोटे आरोप करत नाही, करणार नाही. सरकार कसे चालते हे मला माहिती आहे. त्यामुळे या प्रकरणात कुणावरही खोटे आरोप करणार नाही. घोटाळा आहे मात्र आदिती तटकरेंवर आरोप करणार नाही अस त्या स्पष्ट म्हणाल्या. यामूळे त्यांनी आरोप नक्की कोणावर केले आहेत याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे. पत्रकार परिषदेत बोलताना सुळे यांनी सरकारला चांगलेच धारेवर धरले होते.

लाडकी बहीण योजनेत यांनी 4,800 कोटींचा भ्रष्टाचार झाल्याचा थेट आकडाच सुप्रिया सुळे समोर आणला. त्याचसोबत त्यांनी 4 गंभीर आरोप सरकारवर केले आहेत. त्यांनी सरकारने जी आकडेवारी दिली त्यातूनच हा 4,800 कोटींचा घोटाळा झाल्याचे उघड होते. हा घोटाळा कुणी केला, कसा केला, त्यात कोणाचा सहभाग आहे. बँकेचा आहे की अन्य कुणाचा यावर काही सांगता येणार नाही. यामुळे आता सरकारकडून या आरोपांवर काय प्रतिक्रिया येते याकडे जनतेचे लक्ष लागले आहे.

डायरेक्ट बेनिफिशरी ट्रान्सफर, डीबीटी, थेट हस्तांतरण प्रक्रियेतून लाभार्थ्यांच्या खात्यात पैसे वळते होतात. त्यासाठी अनेक नियम आणि व प्रक्रिया आहे. एक एक कागद तपासला जातो. आधार कार्ड, बँकेचे डिटेल्स तपासले जातात. लाडकी बहीण योजनेचे पैसे देखीव थेट लाभार्थ्यांच्या खात्यात गेले. मग त्यावेळी पुरूषांच्या खात्यात पैसा जात आहे हे समोर आले नाही का? असा सवाल त्यांनी केला. त्यामुळे डिजिटल इंडियाच्या कारभारावर त्यांनी थेट आक्षेप नोंदवला. डीबीटीतून पुरूषांच्या खात्यात पैसा वळता होणे म्हणजे डिजिटल इंडियाचे अपयश आहे अस त्या म्हणाल्या. सरकारने आता या घोटाळ्याची सामुहिक जबाबदारी घ्यावी अशी मागणीही त्यांनी केली आहे.

लाडकी बहीण योजनेत 4800 कोटींचा घोटाळा आहे, लाडकी बहीण योजनेचे पैसे पुरुषांच्या खात्यात जमा झाले, पुरुषांचे फॉर्म रिजेक्ट कसे झाले नाहीत ? असा सवालही त्यांनी उपस्थित केला, मी अदिती तटकरेंवर आरोप करणार नाही, ज्यांनी निर्णय घेतला त्या महाराष्ट्र कॅबिनेटची ही जबाबदारी आहे. लाडकी बहीण योजनेचे सॉफ्टवेअरमधून हा घोटाळा झला आहे. बहिणीनं पैसे दिले आहेत त्याचे स्वागत आहे, पण घोटाळा झाला आहे. या घोटाळ्याची एसआयटी मार्फत चौकशी करण्यात यावी. तसेच लाडकी बहीण योजनेची श्वेतपत्रिका काढावी अशी देखील मागणीही सुप्रिया सुळेंनी केली. 

...

Supriya Sule : Scam of Rs 4,800 crore in Ladki Bahin Yojana, men took advantage, Supriya Sule alleges

Mumbai : लाडकी बहीण योजनेत तब्बल 4800 कोटींचा घोटाळा झाला आहे असा आरोप राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाच्या खासदार सुप्रिया सुळे यांनी केला आहे. त्यांच्या या आरोपांमुळे एकच खळबळ उडाली आहे. इतक्या चाळण्या असताना पुरूष …
[ETV Bharat]'लाडकी बहीण योजने'त घोटाळा, 'एसआयटी' च...
[Mumbai Tak]लाडकी बहीण योजनेत घोटाळा? राष्ट्रवादी ...