1 minute reading time
(120 words)
[Mumbai Tak]लाडकी बहीण योजनेत घोटाळा? राष्ट्रवादी शरद पवार गटाची प्रेस
लाडकी बहीण योजनेत तब्बल 4800 कोटींचा घोटाळा झाला आहे असा आरोप राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाच्या खासदार सुप्रिया सुळे यांनी केला आहे. त्यांच्या या आरोपांमुळे एकच खळबळ उडाली आहे. इतक्या चाळण्या असताना पुरूष लाभार्थी या योजनेत घुसलेच कसे असा थेट सवाल त्यांनी विचारला. लाडकी बहीण योजनेत भ्रष्टाचार झाला आहे. पण त्यासाठी मी या खात्याच्या मंत्री असलेल्या आदिती तटकर यांच्यावर आरोप करणार नाही. मी कोणावरही खोटे आरोप करत नाही, करणार नाही. सरकार कसे चालते हे मला माहिती आहे. त्यामुळे या प्रकरणात कुणावरही खोटे आरोप करणार नाही. घोटाळा आहे मात्र आदिती तटकरेंवर आरोप करणार नाही अस त्या स्पष्ट म्हणाल्या. यामूळे त्यांनी आरोप नक्की कोणावर केले आहेत याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे. पत्रकार परिषदेत बोलताना सुळे यांनी सरकारला चांगलेच धारेवर धरले होते.

