1 minute reading time
(77 words)
[Pune Prime News]पुण्यात वाढत्या गुन्हेगारीविरोधात सुप्रिया सुळे आणि प्रशांत जगताप यांच्या वतीने पोलीस ठाण्यात तक्रार
राज्य सरकारच्या काही विभागांकडून खोटा शासननिर्णय प्रसारित झाल्याप्रकरणी खासदार सुप्रिया सुळे यांनी बुधवारी थेट स्वारगेट पोलिस ठाण्यात जाऊन तक्रार दिली. त्यांनी पोलिस अधिकाऱ्यांना भेटून दोषींवर गुन्हा दाखल करण्याची मागणी केली..सुळे यांनी ऑक्टोबर २०२४ मधील संबंधित शासननिर्णयाची प्रत निवेदनासोबत सादर केली. त्या निर्णयाचा वापर करून नागरिकांची दिशाभूल केली जात असल्याचे त्यांनी निदर्शनास आणून दिले. 'अशा प्रकारांमुळे शासकीय यंत्रणांची विश्वासार्हता धोक्यात येत आहे. अशा प्रकारांवर तातडीने कठोर कारवाई करावी, अन्यथा लोकशाही धोक्यात येईल,' अशी भूमिका त्यांनी मांडली.

