1 minute reading time
(91 words)
[My Mahanagar]नियम, कायद्याने पुण्याची प्रभाग रचना झाली पाहिजे
पुणे महापालिका निवडणुकीसाठी प्रतीक्षेत असलेली प्रभाग रचना शुक्रवारी (22 ऑगस्ट) जाहीर झाली. सर्वोच्च न्यायालयाने स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका घेण्याचे आदेश दिले आहेत. त्यामुळे तीन वर्षे रखडलेल्या निवडणूक प्रक्रियेला आता गती मिळाली आहे. शुक्रवारी महापालिका आयुक्त नवल किशोर राम यांच्या हस्ते प्रारुप प्रभाग रचना जाहीर करण्यात आली. मात्र या प्रभाग रचनेने सगळ्याच पक्षांमध्ये अस्वस्थता आहे. कोणाच्याही दबावाखाली प्रभाग रचना नको, यामध्ये पारदर्शकता असली पाहिजे अशी मागणी राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार गटाच्या खासदार सुप्रिया सुळे यांनी केली आहे. त्यासाठी आज त्यांनी पुणे महापालिकेचे आयुक्त तथा प्रशासक नवल किशोर राम यांची भेट घेतली.

