[Sakal]यंदा गोविंदबागेत दिवाळी साजरी न करण्याचा पवार कुटुंबीयांचा निर्णय
काय आहे कारण? खासदार सुप्रिया सुळे म्हणाल्या, आमच्या काकी...
बारामती : यंदा पवार कुटुंबीयांकडून दिवाळी साजरी (Pawar Family Cancels Diwali Celebrations) केली जाणार नाही, अशी माहिती खासदार सुप्रिया सुळे (Supriya Sule) यांनी समाजमाध्यमांद्वारे जाहीर केली आहे. दरवर्षीप्रमाणे गोविंदबाग येथे होणारा दिवाळी उत्सव आणि पाडव्याच्या भेटींचा कार्यक्रमही रद्द करण्यात आला आहे..
सुळे यांनी आपल्या निवेदनात म्हटले आहे, "आमच्या काकी सौ. भारती प्रतापराव पवार यांचे नुकतेच निधन (Bharti Prataprao Pawar Passed Away) झाले. त्या आमच्यासाठी आईसमान होत्या. त्यामुळे आम्ही सर्व पवार कुटुंबीयांनी मिळून यावर्षी दिवाळी साजरी न करण्याचा निर्णय घेतला आहे."
.त्यांनी पुढे म्हटले, "दरवर्षी गोविंदबाग, बारामती येथे दिवाळी आणि पाडव्याच्या दिवशी सहृद भेटींचा कार्यक्रम होतो. मात्र, यंदा तो कार्यक्रम होणार नाही. कृपया आपण सर्वांनी याची नोंद घ्यावी. तरीही आम्ही सर्वांना आनंद, सुख आणि भरभराटीची दिवाळी जावो, अशा शुभेच्छा देतो.".
दरवर्षी राज्यभरातून हजारो लोक पाडव्याच्या दिवशी पवार कुटुंबीयांना भेटण्यासाठी गोविंदबाग येथे येतात. मात्र, यंदा कुटुंबीयांनी दिवाळी न साजरी करण्याचा निर्णय घेतल्यामुळे हा कार्यक्रम होणार नाही.
.

