2 minutes reading time (416 words)

[Maharashtra Times]पवार साहेब बोलले असतील तर... दोन्ही राष्ट्रवादी एकत्र येण्याच्या चर्चांवर सुप्रिया सुळेंची प्रतिक्रिया

पवार साहेब बोलले असतील तर... दोन्ही राष्ट्रवादी एकत्र येण्याच्या चर्चांवर सुप्रिया सुळेंची प्रतिक्रिया

सातारा: सध्या राज्यातील राजकारणात एक मुद्दा फार चर्चेत आहे, तो म्हणजे दोन्ही राष्ट्रवादी एकत्र येणार का? राष्ट्रवादी काँग्रेस: शरदचंद्र पवार पक्षाने राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या नेतृत्त्वातील पक्षासोबत जाव, असा एक मतप्रवाह पक्षात असल्याचं खुद्द शरद पवार यांनी सांगितलं. त्यामुळे राज्याच्या राजकारणात अनेक चर्चांना उधाण आलं. त्याशिवाय पवार म्हणाले की, केंद्रात विरोधीपक्षात बसायचं की नाही, याचा निर्णय सुप्रिया सुळे यांनी घ्यावा. दोन्ही राष्ट्रवादी यांनी एकत्र येण्यासंदर्भात सुप्रिया सुळे आणि अजित पवार यांनी एकत्र बसून ठरवावं, असंही ते म्हणाले. तसेच, विचारधारा एकच सल्याने भविष्यात जर हे सगळे एकत्र आले तर मला आश्चर्य वाटणार नाही, असंही पवार म्हणाले. त्यावर आता सुप्रिया सुळे यांनी पहिली प्रतिक्रिया दिली आहे.

"मी काय ते वाचलेले नाही. मी काल दिल्लीमध्ये होते ऑल पार्टी मीटिंग होती. त्यानंतर इन्कम टॅक्सचा जो नवीन कायदा येतोय, त्याच्याबद्दल काल मीटिंग होती त्यामुळे कालचा रात्री उशिरापर्यंत त्याच कामात मी व्यस्त होते. रात्री उशिरा मी पुण्यात आले आणि सकाळी उठून साताऱ्यामध्ये आले. या सगळ्या घडामोडींची माहिती सविस्तर माहिती घेऊन सांगेल", असं सुप्रिया सुळे म्हणाल्या.

"हा मुद्दा ना माझ्या ऐकण्यात ना वाचण्यात आला. या दोन्ही वाचून नक्की कळवेन, मला यातील काहीच माहिती नाही. तरी पवार साहेब ज्या गोष्टी बोलले असतील , तर त्याच्यावर कसे काय बोलणार.जो पर्यंत माझी चर्चा होत नाही, काय स्टेटमेंट आले, कोणत्या कॉन्टेक्स्टमध्ये आलं, सगळी माहिती घेतल्याशिवाय कसं काय बोलणार, मला याची काहीच माहिती नाही, सविस्तर माहिती घेऊन तुम्हाला कळवेन", अशी प्रतिक्रिया सुप्रिया सुळे यांनी दिली.

"अनेक ठिकाणच्या कार्यक्रमांमध्ये अनेक एवढे महाराष्ट्राच्या नेत्यांच्या गाठीभेटी होत असतात. कार्यकर्त्यांमध्ये उत्साह असेल. दुसऱ्याला आनंद देण्यात नेहमीच आनंद असेल. सगळ्यांशी चर्चा केल्याशिवाय माझी एकट्याचा विषय आहे का? संघटनेत जेव्हा काम करतो, पहिले पवार साहेब कोणत्या कॉन्टॅक्टमध्ये होते. त्यांनी इंटरव्यू कोठे दिला सगळ्यांची माहिती घेऊन सर्वांशी चर्चा केल्याशिवाय मी कशी काय बोलणार. संघटनेत काम करताना आपण जे बोलतो ते मोजून मापून बोलले पाहिजे. जबाबदारीने बोलले पाहिजे. मला वाटते की अशा परिस्थितीत आमच्या सारख्या लोकांनी जेवढे कमी बोलेल तेवढे सयुक्तिक ठरेल".

"पार्लमेंट बॉडीमध्ये आमचे चांगलं आहे. काल आमची ऑल पार्टी मीटिंग झाली. कॉर्डिनेशन करून काल एकत्र आलो. अशा परिस्थितीमध्ये आम्हाला कुठलेही राजकारण करायचे नाही. आम्ही पूर्ण ताकदीने भारत सरकार बरोबर आहोत. जो काही निर्णय भारत सरकारचा असेल भारतीय आणि जबाबदार म्हणून आम्ही भारत सरकार बरोबर आहोत". 

...

Supriya Sule First Reation About Sharad Pawar Statement Over Ncp Two Factions Alliance Maharashtra Politics;दोन्ही राष्ट्रवादी एकत्र येण्याच्या चर्चांवर सुप्रिया सुळेंची प्रतिक्रिया | Maharashtra Times

Supriya Sule: दोन्ही राष्ट्रवादी एकत्र येणार का, याची चर्चा सध्या राज्याच्या राजकारणात सुरु आहे. त्याबाबात खुद्द शरद पवार यांनी वक्तव्य केलं होतं. यावर आता सुप्रिया सुळे यांनीही प्रतिक्रिया दिली आहे.
[TV9 Marathi]महिलांना मारहाण करणाऱ्या पोलिसांवर का...
[ABP MAJHA]अजित पवारांसोबत हसत-खेळत गप्पा; शरद पवा...