1 minute reading time
(88 words)
[Saam TV]संसद, NEET आणि विद्यार्थ्यांचे प्रश्न; सुप्रिया सुळेंचा सरकारवर हल्लाबोल
राष्ट्रवादी काँग्रेसच्या खासदार सुप्रिया सुळे यांनी लोकशाहीर अण्णाभाऊ साठे यांच्या जयंतीनिमित्त अभिवादन केल्यानंतर विविध मुद्द्यांवर भाष्य केलं. नीट परीक्षा, पेपरफुटी, विद्यार्थ्यांचे प्रश्न आणि संसदेत होणाऱ्या चर्चेवर त्यांनी सरकारला सवाल केले. "नवी पिढी अस्वस्थ आहे, ही काळजीची गोष्ट आहे," असं म्हणत सुप्रिया सुळे यांनी नीट प्रकरणाची पारदर्शक चौकशी करण्याची मागणी केली. सर्वपक्षीय समिती स्थापन करण्याची मागणी केल्याचंही त्यांनी सांगितलं. अमित शाह यांच्या दौऱ्यादरम्यान झालेल्या आंदोलनावर प्रतिक्रिया देताना त्यांनी विरोधकांना विश्वासात घेऊन चर्चा करण्याची गरज व्यक्त केली. विद्यार्थ्यांवरील गुन्हे दाखल झाले तर त्यांच्यासाठी ताकदीने लढू, असंही सुप्रिया सुळे म्हणाल्या.

