1 minute reading time (257 words)

[RNO]"विलीनीकरणाबाबत मला व शरद पवार यांनाही काही माहिती नाही : सुप्रिया सुळे"

"विलीनीकरणाबाबत मला व शरद पवार यांनाही काही माहिती नाही : सुप्रिया सुळे"

On विलीनीकरण

  • मला याबद्दल काही माहिती नाही.. तुमच्याकडून कळलं.. मला आणि शरद पवार यांनाही याबद्दल काही माहिती नाही..
  • आर्थिक संकटात देश जात असताना पंतप्रधानांनी सर्व पक्षांना बोलावून देशातील आर्थिक परिस्थितीवर सविस्तर चर्चा व्हावी अशी आमच्या पक्षाची वारंवार विनंती राहिली आहे..
On आमदार भेटीगाठी
  • देशातील सर्व मंत्र्यांना मी स्वतः दर आठवड्याला भेटते.. म्हणून अस्वस्थता असते का.. विनोद तावडेंना देखील मी काल भेटले.. ते त्यांच्या कामासाठी मी माझ्या कामासाठी आलो.. कोणत्याही राजकीय पक्षातील लोक अनेक वेळा कामासाठी एकमेकांना भेटत असतात..
  • आमच्या आमदार ,खासदार आणि पदाधिकाऱ्यांना कोणी संपर्क केला नाही..
On संजय राऊत
  • तृणमूल काँग्रेसची बैठक सोनिया गांधी आणि ममता बॅनर्जी या दोघांमध्ये झाली होती. त्या दोघी माझ्याशी किंवा मी त्यांच्याशी बोलले नाही.. त्यांच्यात काय बोलणं झालं हे त्यांनाच माहीत..
  • कोण कोणाच्या संपर्कात याबद्दल मला माहिती नाही.. शरद पवार यांच्याकडे कोणताही प्रस्ताव आला नाही.. किंवा शरद पवार यांनी कोणालाही प्रस्ताव दिला नाही..
  • आपापसात तू तू मै मै करून घरफोडा आणि पक्ष फोडा असले उद्योग आम्ही कधी केले नाही आणि करणार नाही ..
  • आता देशाची आर्थिक परिस्थिती राजकारण करायची नव्हे तर देश वाचविण्याची वेळ आहे.. महागाई, बेरोजगारी आणि प्रचंड भ्रष्टाचार सुरू आहे.. आम्ही नीट च्या पेपर संदर्भात मुलांचे भविष्य बघायचं की.. आपापसात वाद करायचं अडचणीत आलेल्या जनतेला आधार द्यायचं.. आम्हाला काही जबाबदाऱ्या आहेत की नाही.. घरफोडा आणि पक्ष फोडा असे उद्योग आम्ही कधी केले नाही आणि करणार नाही..
On रोहित पवार आंदोलन
  • रोहितला अगोदर पासून उपोषण करू नको म्हणून विनंती करत होते... असंवेदनशील सरकार असल्याने त्याच्यासोबत लढायची ताकद ठेवली पाहिजे. त्याच प्रेम शेतकऱ्यावर होतं.. शेतकऱ्यासाठी रोहित लढा उभा करतो याचा मला सार्थ अभिमान.. सरकार किती असंवेदनशील याचा हे उदाहरण आहे. 
[Chudamani News Portal]हर्षवर्धन देशमुखांनी आपल्या...
[Maharashtra Times]नाना पटोलेंचा दावा खरा? सुप्रिय...