1 minute reading time
(72 words)
[TV9 Marathi]खासदार सुप्रिया सुळे यांचं आंदोलन लाईव्ह
"बीड जिल्ह्यातील मस्साजोग गावचे सरपंच संतोष देशमुख यांच्या हत्येचा क्रूरपणा विविध माध्यमांतून समोर आला आहे. महाराष्ट्रात असं राक्षसी कृत्य घडूनही महाराष्ट्रातील सत्ताधारी केवळ स्वतःच्या मंत्र्यांची, त्यांच्या खुनी चेल्यांची कातडी वाचवण्यात व्यस्त आहे," असा आरोप सुप्रिया सुळे यांनी केला. यावेळी संतोष देशमुख हत्याकांड प्रकरणाचा निषेध व्यक्त करुन त्यांना श्रद्धांजली अर्पण करण्यात आली. राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाच्या खासदार सुप्रिया सुळे यांच्या नेतृत्वात पुण्यात मंगळवारी मूक आंदोलन करण्यात आलं, यावेळी त्या बोलत होत्या.