1 minute reading time
(66 words)
[Prabhat Parv News]खासदार सुप्रिया सुळे, नरेश म्हस्के दिबांच्या नावासाठी सुरू असलेल्या जंतरमंतरवरील आंदोलनाला पाठिंबा
नवी मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळाला लोकनेते दिवंगत डी. बा. पाटील यांचे नाव देण्याच्या मागणीसाठी दिल्लीतील जंतरमंतरवर सर्वपक्षीय आंदोलन करण्यात आले. या आंदोलनात शिवसेनेचे खासदार श्रीकांत शिंदे, नरेश म्हस्के, रविंद्र वायकर, श्रीरंग बारणे यांच्यासह राष्ट्रवादी काँग्रेस (शरद पवार) गटाच्या खासदार सुप्रिया सुळे सहभागी झाल्या. आंदोलनानंतर श्रीकांत शिंदे आणि सुप्रिया सुळे यांच्या नेतृत्वाखालील शिष्टमंडळाने केंद्रीय नागरी उड्डाण मंत्री राममोहन नायडू यांची भेट घेऊन मागणीचे निवेदन सादर केले.

