1 minute reading time
(115 words)
[NDTV Marathi]MP Supriya Sule LIVE | NDTV Marathi Manch LIVE | Nari Shakti Maharashtrachi
इंडिया आघाडीचा नारी शक्ती विधेयकाला कधी ही विरोध नाही. ते आमचं विधेयक आहे. आमच्या सरकार वेळी ते विधेयक आणलं गेलं होतं. अशी स्पष्ट भूमीका खासदार सुप्रिया सुळे यांनी मांडली. 'एनडीटीव्ही मराठी'तर्फे 'एनडीटीव्ही मराठी मंच: अनस्टॉपेबल महाराष्ट्र' (NDTV Marathi Manch: Unstoppable Maharashtra) या विशेष कॉन्क्लेव्हचे आयोजन करण्यात आले आहे. या विशेष कॉन्क्लेव्हची थीम 'नारी शक्ती महाराष्ट्राची' अशी होती. त्यात बोलताना सुप्रिया सुळे यांनी आपली भूमीका स्पष्ट केलं. त्या पुढे म्हणाल्या की महिलांना आरक्षण देणारं पहिलं राज्य महाराष्ट्र आहे. शरद पवार हे त्यावेळी मुख्यमंत्री होते. असं असताना नारी शक्ती विधेयकाला आम्ही का विरोध करू असा प्रश्न ही त्यांनी केला. शिवाय आमचा या विधेयकाला विरोध काल ही नव्हता. आज ही नाही असं ही त्या यावेळी म्हणाल्या.

