1 minute reading time
(103 words)
[ABP MAJHA]खासदार सुप्रिया सुळे लाईव्ह
नुकताच महाराष्ट्राच्या राजकारणात भूकंप झाला. उद्धव ठाकरे गटाचे सहा खासदार फुटले. आता या खासदार फुटीबद्दल नवीन माहिती समोर आली आहे. फुटलेल्या सहा खासदारांना भाजपचं कमळ हाती घ्यायचं होतं. सहावा खासदार एकनाथ शिंदे यांच्याकडे जायला तयार नव्हता. यामध्ये देवेंद्र फडणवीस यांची शिष्टाई कामाला आली अशी चर्चा आहे. यावर खासदार सुप्रिया सुळे यांना पत्रकारांनी विचारलं. "मला एकच वाटतं या देशात लोकशाही संपुष्टात आलीय का?. घरं,पक्ष फोडतात. निवडून आलेत दोन-अडीज वर्ष झालेली. 2029 मध्ये निवडणुका होत्या. इतकी घाई कशाला करायची. एखाद्या चांगल्या विधेयकासाठी, जीएसटीच्यावेळी बिल पास करण्यासाठी काँग्रेसने आम्ही एकमताने भाजपला मदत केली. त्यासाठी तोडफोड करण्याची गरज काय आहे?" असा सवाल सुप्रिया सुळे यांनी विचारला.

