1 minute reading time (297 words)

[ETV Bharat]आमदार संजय गायकवाड यांच्याविरोधात खासदार सुप्रिया सुळे यांची स्वारगेट पोलिसांकडं तक्रार

आमदार संजय गायकवाड यांच्याविरोधात खासदार सुप्रिया सुळे यांची स्वारगेट पोलिसांकडं तक्रार

पुणे : राज्यात सध्या पावसाळी अधिवेशन सुरू असल्याने आमदार संजय गायकवाड हे आकाशवाणी आमदार निवासात मुक्कामी आहेत. मंगळवारी रात्री आपल्याला निकृष्ट आणि शिळे जेवण दिल्याचं सांगत कॅन्टीन कर्मचाऱ्याला त्यांनी मारहाण केली. संतप्त झालेल्या गायकवाड यांनी कॅन्टीन चालकाला देखील धारेवर धरलं. आमदार गायकवाड यांचा हा व्हिडिओ सध्या सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे. तर आता त्यांच्याविरोधात खासदार सुप्रिया सुळे (Supriya Sule) यांनी पुण्यातील स्वारगेट पोलीस स्टेशन येथे तक्रार दिली आहे.

आमदार निवासात केली मारपीट : यावेळी खासदार सुप्रिया सुळे म्हणाल्या, "आम्ही तीन चार महत्वाच्या विषयावर तक्रारी केल्या आहेत. पुणे शहरात कोयता गँग तसंच विविध गुन्ह्यात वाढ झाली आहे. दुसरी महत्त्वाची गोष्ट म्हणजे एका आमदाराने आमदार निवासात मारहाण केली. आमदार निवास जिथं काही आमदार राहण्यासाठी येतात. मी समजू शकते जेवण खराब असेल पण याची तक्रार कम्प्लेंट बुकमध्ये करायला हवी होती. प्रत्येक ठिकाणी कम्प्लेंट बुक असतात. पण जर आमदार निवासात अशी मारहाण करत असेल तर काय आदर्श आपण महाराष्ट्राला देणार आहोत. याप्रकरणी सरकारने गुन्हा दाखल करायला पाहिजे होता. पण सरकारने काही गुन्हा दाखल केला नाही. विरोधी पक्षाने काही नाही केलं तरी आमच्या घरात ईडी पोहचतात, हे खूप दुर्दैवी आहे. तसाच महत्त्वाचा विषय म्हणजे राज्यात खोटे जीआर काढले जात आहेत आणि करोडो रुपयांची कामे केली जात आहेत. असे खोटे जीआर कोण काढतं? याची पारदर्शक चौकशी झाली पहिजे".

पारदर्शक चौकशी झाली पहिजे : ग्रामविकास विभागाचा खोटा जीआर आला आहे. यात मुख्यमंत्र्यांनी लक्ष घालावं आणि पारदर्शक चौकशी करावी. याची माहिती आम्ही पोलिसांना दिली आहे. त्यांनी आम्हाला सांगितलं की, आम्ही माहिती काढतो. याबाबत गुन्हा दाखल करण्याची प्रशांत जगताप यांची मागणी आहे आणि आम्ही याचा फॉलोअप घेणार आहोत, असं यावेळी सुप्रिया सुळे म्हणाल्या. 

...

आमदार संजय गायकवाड यांच्याविरोधात खासदार सुप्रिया सुळे यांची स्वारगेट पोलिसांकडं तक्रार

आमदार संजय गायकवाड यांच्यावर गुन्हा दाखल करण्याची मागणी, राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाच्या खासदार सुप्रिया सुळे (Supriya Sule) यांनी केली आहे.
[Letsupp]आपण महाराष्ट्राला कोणता आदर्श देणार? गायक...
[Loksatta]सत्तर - नव्वद हजार कोटींच्या रस्त्यांसाठ...