1 minute reading time (103 words)

[RNO ]खासदार सुप्रिया सुळे

 खासदार सुप्रिया सुळे

राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाच्या वतीनं डॉ.बाबासाहेब आंबेडकर पुतळ्याजवळ पक्षाच्या नेत्या खासदार सुप्रिया सुळे यांच्या नेतृत्वाखाली आंदोलन करण्यात आलं. यावेळी त्यांना याबाबत विचारलं असता त्यांनी आपलं मत व्यक्त केलं. यावेळी सुप्रिया सुळे म्हणाल्या की, "जेव्हा हा जनसुरक्षा कायदा आणण्यात आला तेव्हा आम्ही महाविकास आघाडीतर्फे याला विरोध केला होता. कमिटीमध्ये अनेक सूचना केल्यावर देखील याची काहीच अंमलबजावणी करण्यात आली नाही. एकीकडं सरकार सांगत आहे की, आम्ही देशात नक्षलवाद संपवलं आहे. तर दुसरीकडं अश्या पद्धतीनं सरकारनं कायदा आणला आहे. हा निर्णय संविधान विरोधी घेण्यात आलेल आहे. म्हणून आम्ही सर्वजण या विरोधात आंदोलन केलं आहे. सरकारने हा कायदा रद्द करावा अशी आमची मागणी आहे."  

[tv9marathi]सुप्रिया सुळे यांचा सुनेत्रा पवार यांन...
[TV9 Marathi]जनसुरक्षा कायद्याच्या विरोधात आक्रमक,...