1 minute reading time
(58 words)
[Lokmat]मोदींचं कौतुक पण भाजप खासदाराला झापले, सुप्रिया सुळे का पेटल्या?
'पहलगाममध्ये नृशंस हल्ला करणारे दहशतवादी किती होते, ते कोठून आले व या दहशतवाद्यांना पकडले वा ठार केले जात नाही, तोवर ' ऑपरेशन सिंदूर 'चा उत्सव साजरा करणे योग्य नाही', अशा कानपिचक्या राष्ट्रवादी काँग्रेसच्या (शप) गटनेत्या सुप्रिया सुळे यांनी सोमवारी लोकसभेत मोदी सरकारला दिल्या. या मोहिमेबाबत सरकारने एक सविस्तर अहवाल करून तो देशवासीयांसमोर मांडावा, अशी मागणीही त्यांनी केली.

