2 minutes reading time (450 words)

[Navarashtra]शरद पवारांची राष्ट्रवादी आणि काँग्रेसचे विलीनीकरण? सुप्रिया सुळे यांचं मोठं विधान; ‘सध्या देश वाचवण्याची गरज…’

शरद पवारांची राष्ट्रवादी आणि काँग्रेसचे विलीनीकरण? सुप्रिया सुळे यांचं मोठं विधान; ‘सध्या देश वाचवण्याची गरज…’

एकीकडे राज्यात विधान परिषद निवडणुकांचे बिगुल वाजलेले असताना आता दुसरीकडे शरद पवारांच्या राष्ट्र्रवादि काँग्रेस काँग्रेसमध्ये विलीनीकरण होत असल्याच्या चर्चाना जोर आला आहे. महायुती आणि महाविकास आघाडीच्या नेत्यांनीही यावर भाष्य केल्याने त्या चर्चाना अजून जास्त उधाण आले. आता यावर खुद्द राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार पक्षाच्या खासदार सुप्रिया सुळे यांनी भाष्य केले आहे.

राष्ट्रवादीच्या विलीनीकरणावर मोठे भाष्य

सुप्रिया सुळे यांनी आज (शनिवार, १३ जून) माध्यमांशी संवाद साधला यावेळी राष्ट्रवादीच्या काँग्रेसमध्ये होणाऱ्या कथित विलीनीकरणाच्या चर्चेबाबत त्या म्हणाल्या, "आमदार, खासदार किंवा अन्य कोणाशीही कोणीच संपर्क केलेला नाही, विलीनीकरणाची हि चर्चा कुठून झाली, याची कल्पना मला नाही. कोण कोणाच्या संपर्कात आहे, याची मला कल्पना नाही. शरद पवार यांच्याकडे कोणताही प्रस्ताव आलेला नाही," असे थेट भाष्य त्यांनी यावेळी केले.

काँग्रेसमध्ये होणार तृणमूल काँग्रेस विलीन?तृणमूल काँग्रेस पक्षातील बंडखोरी आणि त्यानंतर काँग्रेसमधील त्यांच्या विलीनीकरणाच्या होणाऱ्या चर्चांबाबतहि त्यांनी भाष्य केले. त्या म्हणाल्या, "काँग्रेस पक्षाच्या विलीनीकरणाविषयी नेमकं काय सुरु आहे, याची मला कल्पना नाही. कारण तृणमूल काँग्रेसच्या प्रमुख ममता बॅनर्जी यांची बैठक हि काँग्रेसच्या माजी अध्यक्ष सोनिया गांधी यांच्यासोबत झाली. या बैठकीत त्या दोघीच होत्या. त्यामुळे, त्यांनी माध्यमांना विलीनीकरणाविषयी काही सांगितलं आहे कि नाही, याची मला कल्पना नाही. विलीनीकरणाबाबत माझया काही वाचनात आलेले नाही," असे त्या म्हणाल्या.

सध्या देश वाचवण्याची गरज

देशातील सध्याची परिस्थिती लक्षात घेता विलीनीकरण हा एक पर्याय असू शकतो का? असा प्रश्न मध्यमकर्मीनी विचारला असता त्यावर सुप्रिया सुळे म्हणाल्या, "देशाची आर्थिक, राजकीय, सामाजिक परिस्थिती खूप वाईट का आहे? सध्या राजकारण करण्याची वेळ नाही. सध्या देश वाचवण्याची गरज आहे. महागाई, बेरोजगारी, प्रचंड भ्रष्टाचार, पेपरदुती यांसारखे प्रश्न गंभीर बनले आहेत. त्यामुळे एकमेकांशी भांडण करत बसायचे कि हे प्रश्न सोडवायचे याचा विचार करणे गरजेचे आहे," असे त्या यावेळी म्हणाल्या.

नेमकं प्रकरण काय?

राष्ट्रवादी काँग्रेस (SP) चे काँग्रेसमध्ये विलीनीकरण होण्याबाबतच्या चर्चांनीही पक्षाच्या २७ व्या स्थापना दिनाच्या सुमारास जोर धरला होता. काँग्रेसचे आमदार आणि ज्येष्ठ नेते नाना पटोले यांनी असा दावा केला की, राष्ट्रवादी काँग्रेस (शरद पवार गट) कडून काँग्रेसमध्ये विलीनीकरणाचा प्रस्ताव यापूर्वीच मांडण्यात आला होता; या विधानानंतर या चर्चेने अधिक जोर धरला.

आमदार नाना पटोले यांनी प्रसारमाध्यमांना सांगितले, "शरद पवार यांनी यापूर्वी काँग्रेसमध्ये विलीनीकरणाचा प्रस्ताव पाठवला होता, परंतु काही कारणांमुळे त्यावर पुढे कोणतीही प्रगती होऊ शकली नाही. देशभरातील समान विचारसरणीच्या पक्षांना एकत्र आणण्याची प्रक्रिया सुरू आहे आणि तृणमूल काँग्रेस तसेच राष्ट्रवादी काँग्रेस (शरद पवार गट) देखील या दिशेने विचार करत आहेत." मात्र, राष्ट्रवादी काँग्रेस (शरद पवार गट) चे प्रदेशाध्यक्ष शशिकांत शिंदे यांनी हे दावे फेटाळून लावले. 

...

शरद पवारांची राष्ट्रवादी आणि काँग्रेसचे विलीनीकरण? सुप्रिया सुळे यांचं मोठं विधान; ‘सध्या देश वाचवण्याची गरज…’ | Navarashtra

एकीकडे राज्यात विधान परिषद निवडणुकांचे बिगुल वाजलेले असताना आता दुसरीकडे शरद पवारांच्या राष्ट्र्रवादि काँग्रेस काँग्रेसमध्ये विलीनीकरण होत असल्याच्या चर्चाना जोर आला आहे. आता यावर खुद्द राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार पक्षाच्या खासदार सुप्रिया सुळे यांनी भाष्य केले आहे.
[ETV Bharat]'पवार साहेबांकडे कोणताही प्रस्ताव नाही...
[Chudamani News Portal]हर्षवर्धन देशमुखांनी आपल्या...