1 minute reading time
(76 words)
[ABP MAJHA]बहिणीचं ऐकेल,तुम्ही अजितदादांना सांगा;शिक्षकांची सुप्रिया सुळेंकडे मागणी
राज्यातील विनाअनुदानित खासगी शिक्षकांनी आपल्या मागण्यांसाठी पुन्हा एकदा आझाद मैदान गाजवले आहे. या आंदोलनाला आज राष्ट्रवादी काँग्रेस (शरद पवार गट) नेत्या आणि खासदार सुप्रिया सुळे यांनी थेट उपस्थित राहून समर्थन दिलं. आंदोलक शिक्षकांनी सुळे यांच्याशी संवाद साधताना स्पष्टपणे सांगितलं की, ''सगळं तुमच्या भावाच्या हातात आहे, बहीणीचं भाऊ ऐकेल.'' यावर प्रतिक्रिया देताना सुप्रिया सुळे म्हणाल्या की, ''माझा भाऊ (अजित पवार) अर्थमंत्री असला तरी सरकारचा चेहरा आणि निर्णयप्रक्रियेचा अध्यक्ष देवेंद्र फडणवीस आहेत. त्यामुळे फडणवीसांनी निर्णय घ्यायला हवा.''

