1 minute reading time
(82 words)
[Loksatta]४,८०० कोटी कोणाच्या अकाऊंटमध्ये गेले?"; सुप्रिया सुळेंचा सरकारला सवाल
मुख्यमंत्री लाडकी बहीण योजना हा महाष्ट्रातील सर्वात मोठा भ्रष्टाचार आहे. मी एक वर्षापासून सांगत आहे, की राज्याची आर्थिक परिस्थिती हलाखीची आहे. लाडकी बहीण योजनेत पुरुषांनीदेखील सहभाग घेतल्याचे समोर आले आहे. लाडकी बहीण योजनेत जो घोटाळा झाला आहे, त्याबाबत मुख्यमंत्र्यांनी चौकशी करावी. ४ हजार ८०० कोटी रुपयांचा हा भ्रष्टाचार असून सरकारने या योजनेची श्वेतपत्रिका प्रसिद्ध केली पाहिजे. सरकारने उत्तर दिले नाही, तर त्यांना कोर्टात यासंबंधीचे उत्तर द्यावे लागेल, असा इशारा राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार पक्षाच्या कार्याध्यक्षा सुप्रिया सुळे यांनी सोमवारी दिला आहे.

