1 minute reading time
(108 words)
[Zee 24 Taas]'बच्चू कडू मवितासोबत आले तर...'; सुप्रिया सुळे काय म्हणाल्या?
प्रहार संघटनेचे नेते बच्चू कडू यांनी आज शरद पवार यांची भेट घेतली. त्यामुळे बच्चू कडू महाविकास आघाडीत येणार असल्याच्या चर्चांनी जोर धरला आहे. त्याबाबत सुप्रिया सुळे यांना विचारण्यात आलं. पण त्यावर थेट भाष्य केलं नाही. आम्ही सगळे लोकप्रतिनिधी जनतेचे सेवा करणारे आहोत. समाजात चांगले बदल घडावा म्हणून आम्ही प्रयत्न करतो. बच्चू भाऊंनी गेले अनेक वर्ष चांगलं काम करत समाजातील लोकांना मदत केलेली आहे. आम्ही सगळे महाराष्ट्राची सेवा करण्यासाठी काम करतो, बच्चू कडू हे महत्त्वाचे नेते आहेत. आमच्यात राजकीय मतभेद असतात आणि ते असलेच पाहिजे. परंतु त्यांनी नेहमी समाजासाठी चांगलं काम केलेलं आहे. त्यांनी चांगलं काम करून महाराष्ट्रातील एका दुर्लक्षित प्रश्नाला वाचा फोडलेली आहे, असं सुप्रिया सुळे म्हणाल्या.

