1 minute reading time (99 words)

[ABP MAJHA]महाराष्ट्राचा क्राईम रेट ते शेतकरी आत्महत्या; सुप्रिया सुळेंचा सरकारवर निशाणा

महाराष्ट्राचा क्राईम रेट ते शेतकरी आत्महत्या; सुप्रिया सुळेंचा सरकारवर निशाणा

महाराष्ट्र विशेष सार्वजनिक सुरक्षा कायदा विधेयकाला राष्ट्रवादी शरद पवार गटाच्या खासदार सुप्रिया सुळे यांनी विरोध केलाय. महाराष्ट्र विशेष सार्वजनिक सुरक्षा कायदा विधेयकातील बेकायदेशीर कृत्य या संकल्पनेचा माध्यमातून शासकीय यंत्रणांना अमर्यादित अधिकार प्रदान करण्यात आल्याचा आरोप त्यांनी केलाय. तर शासकीय यंत्रणांना अमर्याद अधिकार देऊन राज्यात पोलीसराज प्रस्थापित करायचा आहे का? असा सवाल त्यांनी सरकारला केलाय. सरकारकडून या संकल्पनेच्या माध्यमातून शासनाच्या विरोधात असलेल्या परंतु लोकशाही मार्गाने विरोध करणाऱ्या व्यक्ती, संस्था, संघटना यांच्या विरोधात कारवाई करण्याचा डाव आहे. सरकार नागरिकांच्या मूलभूत अधिकारांची पायमल्ली करत असून थेट इंग्रजांनी आणलेल्या रौलेक्ट अ‍ॅक्टसारखा कायदा पुन्हा आणत असल्याचे देखील सुप्रिया सुळे यांनी म्हटले आहे.  

[Lokshahi Marathi]बारामतीत ऊस परिषद सुप्रिया सुळे ...
[Maharashtra Times]नाराज असल्याची चर्चा अन् जयंत प...