2 minutes reading time (335 words)

[My Mahanagar]स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका रोखल्यायत

स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका रोखल्यायत

सुप्रिया सुळेंचा सत्ताधाऱ्यांवर आरोप

मुंबई : गेल्या काही दिवसांपासून मुंबई विद्यापीठाच्या सिनेट निवडणुकीकडे सर्वांचे लक्ष होते. या निवडणुकीमध्ये शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाच्या युवासेनेने 10पैकी 10 जागांवर विजय मिळवला आहे. याबद्दल युवासेना आणि सर्व विजयी उमेदवारांचे अभिनंदन करताना राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाच्या कार्यकारी अध्यक्ष आणि खासदार सुप्रिया सुळे यांनी सत्ताधाऱ्यांवर निशाणा साधला आहे. (Supriya Sule alleges that the Mahayuti government has blocked the elections of local bodies)

मूळ वेळापत्रकानुसार मुंबई विद्यापीठाची सिनेट निवडणूक 22 सप्टेंबर रोजी होणार होती. मात्र, अचानक त्याच्या दोन दिवस आधी म्हणजे 20 सप्टेंबर रोजी रात्री ही निवडणूक स्थगित केल्याचे पत्रक मुंबई विद्यापीठाने जारी केले. विद्यापीठाच्या या निर्णयाविरोधात युवा सेनेने मुंबई उच्च न्यायालयात धाव घेतली होती. त्यावर तातडीने सुनावणी घेत उच्च न्यायालयाने 22 सप्टेंबरलाच निवडणूक घेण्याचे आदेश दिले होते. मात्र, तत्काळ निवडणूक घेण्यास विद्यापीठाने असमर्थता दर्शवल्याने ही निवडणूक 24 सप्टेंबरला घेण्यात आली.

मुंबई विद्यापीठाच्या सिनेट निवडणुकीची मतमोजणी काल, शुक्रवारी पार पडली. त्यात भाजपाच्या अखिल भारतीय विद्यार्थी परिषदेचे पानिपत झाले. सर्वच्या सर्व जागा युवासेनेने जिंकल्या. सुरुवातीला राखीव पाच जागांचे निकाल जाहीर झाले आणि त्या सर्व युवासेनेने जिंकल्या. त्यापाठोपाठ खुल्या वर्गातील पाचही जागा युवसेनेच्याच उमेदवारांनी विजय मिळविला. यावर युवासेनाप्रमुख आणि आमदार आदित्य ठाकरे यांनी यावर प्रतिक्रिया देताना सांगितले की, सिनेट निवडणुकीचा विजय ही सुरुवात आहे. हीच पराभवाची भीती असल्यामुळे राज्यामधील स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका महायुतीकडून घेतल्या जात नाहीत.

या पार्श्वभूमीवर खासदार सुप्रिया सुळे यांनी ट्वीट करून आदित्य ठाकरे यांचा मुद्दा लावून धरला आहे. मुंबई विद्यापीठाच्या सिनेट निवडणुकीत युवासेनेच्या उमेदवारांनी एकतर्फी विजय मिळविला. ही निवडणूक सत्ताधारी भाजपाकडून सातत्याने पुढे ढकलण्यात येत होती. राज्यातील स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकाही सत्ताधाऱ्यांनी अशाच पद्धतीने अडवून धरलेल्या आहेत, असा आरोप करून त्या म्हणतात की, या निवडणूका होतील तेव्हा जनता त्यांना चोख उत्तर देईल. 

...

Senate Election : Supriya Sule alleges that the Mahayuti government has blocked the elections of local bodies msj

(Senate Election) मुंबई : गेल्या काही दिवसांपासून मुंबई विद्यापीठाच्या सिनेट निवडणुकीकडे सर्वांचे लक्ष होते. या निवडणुकीमध्ये शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाच्या युवासेनेने 10पैकी 10 जागांवर विजय मिळवला आहे. याबद्दल युवासेना आणि सर्व विजयी उमेदवारांचे अभिनंदन …
[TV9 Marathi]महाराष्ट्राच्या पहिल्या महिला मुख्यमं...
[ABP MAJHA]"मी फकीरासारखी निवडणूक लढवली अन्..."