2 minutes reading time (370 words)

[Time Maharashtra]शिक्षण हा खूप गंभीर विषय आहे. ‘त्यांचं सरकार की आमचं सरकार’ असा प्रश्न न करता त्याच राजकारण …

शिक्षण हा खूप गंभीर विषय आहे. ‘त्यांचं सरकार की आमचं सरकार’ असा प्रश्न न करता त्याच राजकारण …

Supriya Sule: आज राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या खासदार सुप्रिया सुळे यांनी नागपूर येथे पत्रकार परिषद घेतली. त्यावेळी आमच्या पक्षाच्या संघटनात्मक बैठकीसाठी मी नागपूरमध्ये दाखल झाले आहे. यासोबतच काँग्रेस नेते सुनील केदार यांची मुलगी पौर्णिमा केदार यांच्या एका इन्स्टिट्यूटच्या कार्यक्रमात मी सहभागी होणार आहे. भाषा शिक्षण हा केवळ राजकीय विषय नाही, तर अतिशय महत्त्वाचा सामाजिक आणि शैक्षणिक विषय आहे. भाषेच्या संदर्भातील जाणकार, तज्ञ यांचे विचार जाणून घेणे अत्यावश्यक आहे. हा विषय फक्त राजकारण म्हणून हाताळणे योग्य ठरणार नाही, असे सध्या राज्यात सुरु असणाऱ्या हिंदी मराठी मुद्द्यावरून सुप्रिया सुळे यांनी आपले मत मांडले.

राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष शरद पवार मराठीच्या संदर्भात होणाऱ्या मोर्चामध्ये पूर्ण ताकदीने सहभागी होणार आहे. आमच्या पक्षाकडून 'कोण' त्या मोर्चात सहभागी होणार आहे, हे आज किंवा उद्या स्पष्ट केले जाईल. आम्ही लोकप्रतिनिधी आहोत, त्यामुळे आमच्यासमोर सर्व लोकांच्या भावना ऐकून घेण्याची जबाबदारी असते. हीच लोकप्रतिनिधीची खरी ताकद आहे. भाषा शिक्षण हा केवळ राजकीय विषय नाही, तर अत्यंत महत्त्वाचा सामाजिक व शैक्षणिक विषय आहे. भाषेसंदर्भात जे जाणकार आणि तज्ज्ञ आहेत, त्यांचे मत, माहिती आणि विचार जाणून घेणे आवश्यक आहे. केवळ राजकारण म्हणून हा विषय हाताळणे योग्य नाही. माशेलकर आणि सुखदेव थोरात यांच्या समितीने तो निर्णय घेतला होता, तेव्हा महाविकास आघाडीचे सरकार होते. मी विनम्रपणे देवेंद्र फडणवीस यांना सांगू इच्छिते की, सत्तेत आणि प्रशासनात काम करण्याचा त्यांना माझ्यापेक्षा अधिक अनुभव आहे. या प्रकारच्या समित्या निर्णय घेण्यासाठी नसतात, त्या शिफारसी देण्यासाठी असतात. मी 'वन नेशन, वन इलेक्शन' या समितीवर आहे, पण आमचं सांगणं म्हणजे निर्णय नसतो, आम्ही फक्त माहिती घेतो, असा देखील सुप्रिया सुळे म्हणाल्या.

असतो. त्यामुळे देवेंद्रजींना बोलण्याचा अधिकार नक्कीच आहे. कोणताही निर्णय अंतिम नसतो. अनेक वेळा चर्चा होते, देवाणघेवाण होते. आणि चर्चा सुरू आहे. मी पुन्हा सांगते, शिक्षण हा विषय खूप गंभीर आहे. 'त्यांचं सरकार की आमचं सरकार' असा प्रश्न नाही. शिक्षणासंदर्भातला निर्णय तज्ज्ञांनी आणि पालकांनी मिळून घ्यायला हवा. 

...

Supriya Sule: Education Is A Very Serious Issue. Without Asking The Question 'their Government Or Our Government', Let's Pursue The Same Politics...

भाषा शिक्षण हा केवळ राजकीय विषय नाही, तर अतिशय महत्त्वाचा सामाजिक आणि शैक्षणिक विषय आहे. भाषेच्या संदर्भातील जाणकार, तज्ञ यांचे विचार जाणून घेणे अत्यावश्यक आहे. हा विषय फक्त राजकारण म्हणून हाताळणे योग्य ठरणार नाही, असे सध्या राज्यात सुरु असणाऱ्या हिंदी मराठी मुद्द्यावरून सुप्रिया सुळे यांनी आपले मत मांडले.
[zeenews]युगेंद्र पवारांचा झाला साखरपुडा ... खासदा...
[Maharashtra Times]शिक्षण विषय गंभीर असून शिक्षणतज...