1 minute reading time (271 words)

[Maharashtra Times]मराठी खासदारांची अमेरिकेत हवा

सुप्रिया सुळे जिंकल्यानंतर न्यूयॉर्कमध्ये झळकले बॅनर

सुप्रिया सुळे जिंकल्यानंतर न्यूयॉर्कमध्ये झळकले बॅनर

राज्यातील लोकसभा निवडणूकीचे निकाल समोर आले आहेत. अन् या निकालांमध्ये शिवसेना (उद्धव ठाकरे गट), राष्ट्रवादी कॉंग्रेस (शरद पवार गट) आणि कॉंग्रेस या तीन पक्षांच्या महाविकास आघाडीनं बाजी मारलेली दिसतेय. या तीन पक्षांनी मिळून तब्बल ३१ जागांवर विजय मिळवला आहे. त्यामुळे अर्थातच भाजपाचा विजयी रथ रोखल्यामुळे सध्या पूर्ण देशात महाराष्ट्रातील या निकालांची चर्चा होतेय. पण आश्चर्याची बाब म्हणजे ही चर्चा आता केवळ भारतापूरतीच मर्यादीत राहिलेली नाही तर पार न्यूयॉर्कमध्ये सुद्धा महाराष्ट्रातील निकाल झळकत आहेत. होय, अमेरिकेतील टाईम्स क्वेअरवर सुप्रिया सुळे यांच्या विजयाचे बॅनर झळकत आहेत. हा व्हायरल होणारा व्हिडीओ पाहून तुम्ही देखील थक्कच व्हाल. (फोटो सौजन्य - @ivaibhavk/Twitter) 

बारामतीमध्ये सुप्रिया सुळे आणि सुनेत्रा पवार यांच्यात तुल्यबळ लढाई होती. राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार हे स्वत: पत्नी सुनेत्रा यांचा प्रचार करत होते. शिवाय निवडणूकीचा प्रचार करताना त्यांनी सुप्रिया सुळे यांच्यावर कठोर शब्दात टीका देखील केली होती. पण निवडणूकीचा निकाल मात्र सुप्रिया सुळे यांच्या बाजूनं लागला. त्यांनी जवळपास २ लाख मतांच्या फरकानं बारामतीत विजय मिळवला. अन् या विजयाचा जल्लोष आता पार न्यूयॉर्कपर्यंत पोहोचला आहे. सोशल मीडियावर टाईम्स स्क्वेअर इमारतीचा व्हिडीओ व्हायरल होत आहे. या व्हिडीओमध्ये तुम्ही सुप्रिया सुळे यांचा विजयी बॅनर पाहू शकता. त्यांना बारामतीमध्ये मिळवलेल्या विजयाबद्दल शुभेच्छा दिल्या जात आहेत. (फोटो सौजन्य - @ivaibhavk/Twitter)

[Saam TV]अजित पवार गटाच्या नेत्यांसाठी दरवाजे खुले...
[Time Maharashtr]सातासमुद्रापार झळकली ‘बाप- लेकीची...