2 minutes reading time (321 words)

[Loksatta]OBC प्रमाणपत्रावरुन आधी सुप्रिया सुळेंवर केले आरोप

OBC प्रमाणपत्रावरुन आधी सुप्रिया सुळेंवर केले आरोप

नंतर विजय वडेट्टीवारांचा माफीनामा; म्हणाले, "खेद…"

Supriya Sule OBC Certificate Allegation Controversy: काँग्रेस नेते, आमदार विजय वडेट्टीवार यांनी राष्ट्रवादी काँग्रेसच्या (शरद पवार) खासदार सुप्रिया सुळे यांच्याकडे ओबीसी प्रमाणपत्र अससल्याचा आरोप केला. याप्रकरणी सुप्रिया सुळे यांनी आक्रमक भूमिका घेत वडेट्टीवार यांचे आरोप धादांत खोटे असल्याचे म्हटले. तसेच, आरोप सिद्ध करावा अन्यथा जाहीर माफी मागावी, अशी मागणी केली. यानंतर आता वडेट्टीवार यांनी स्पष्टीकरण देताना सुप्रिया सुळे यांच्या नावाचा अनावधानाने उल्लेख झाल्याचे सांगत खेद व्यक्त केला आहे.

आरोपानंतर सुप्रिया सुळे आक्रमक

विजय वडेट्टीवारांनी ओबीसी प्रमाणपत्राच्या संदर्भात भूमिका मांडताना खासदार सुप्रिया सुळे यांच्याकडे ओबीसी प्रमाणपत्र असल्याचा आरोप केला. या आरोपानंतर सुप्रिया सुळे आक्रमक झाल्या व त्यांनी वडेट्टीवारांचे आरोप खोटे असल्याचे सांगितले. "विजय वडेट्टीवार यांनी माझ्याकडे ओबीसी प्रमाणपत्र असल्याचा धादांत खोटा आरोप केला आहे. माझ्याकडे ओबीसी प्रमाणपत्र असल्याची माहिती त्यांना नेमकी कोणी आणि कोणत्या आधारावर दिली, हे त्यांनी जाहीर करावे", अशी आव्हान सुळेंनी वडेट्टीवारांना दिले.

माफी मागण्याची मागणी

सुप्रिया सुळेंनी 'एक्स' या सोशल मीडिया हँडलवरुन केलेल्या पोस्टमध्ये वडेट्टीवारांनी निराधार वक्तव्याप्रकरणी माफी मागण्याची मागणी केली. "माझ्याकडे ओबीसी प्रमाणपत्र असल्याचा त्यांचा दावा असेल, तर त्यांनी त्यासंदर्भातील पुरावा जाहीरपणे सादर करावा आणि ते सिद्ध करावे. अन्यथा कोणत्याही पुराव्याशिवाय केलेल्या या आरोपाबद्दल त्यांनी जाहीर माफी मागावी", अशी मागणी सुळेंनी केली. 

वडेट्टीवारांनी दिले स्पष्टीकरणयाप्रकरणी वडेट्टीवारांनी सुप्रिया सुळे यांच्या नावाचा उल्लेख अनावधानाने झाल्याचे स्पष्ट केले आहे. ओबीसी प्रमाणपत्राच्या संदर्भात माझी भूमिका मांडताना खासदार सुप्रिया सुळे यांच्या नावाचा अनावधानाने उल्लेख झाला. त्यामागे त्यांच्यावर कोणताही आरोप करण्याचा माझा हेतू नव्हता. अनावधानाने त्यांच्या नावाचा उल्लेख झाल्याबद्दल खेद व्यक्त करतो, असे वडेट्टीवारांनी 'एक्स' या सोशल मीडिया हँडलवर केलेल्या पोस्टमध्ये म्हटले आहे.

वडेट्टीवारांनी पुढे पोस्टमध्ये, "याचा अर्थ ओबीसी प्रमाणपत्र घेणाऱ्या मराठा नेत्यांबाबत माझी भूमिका बदललेली नाही. एकीकडे ओबीसी प्रमाणपत्र घेऊन सत्तेचा लाभ घ्यायचा आणि दुसरीकडे ओबीसी समाजाच्या हक्कांवर आघात करायचा, ओबीसींच्या पाठीत खंजीर खुपसायचा, या भूमिकेचे मी कधीही समर्थन करणार नाही. माझा संघर्ष कोणत्याही व्यक्तीविरोधात नसून ओबीसी समाजाच्या हक्कांच्या संरक्षणासाठी आणि सामाजिक न्यायासाठी आहे", असेही स्पष्ट केले.

[ABP MAJHA]प्रिय दादा, आज राखीपौर्णिमा...; सुप्रिय...
[Zee 24 Taas]To The Point With Kamlesh Sutar | Sup...