[Time Maharashtra]लोकशाही जिवंत ठेवण्यासाठी सगळे एकत्र येत असतील तर गैर काय? -Supriya Sule
Supriya Sule: कालच्या मीटिंगबाबत आज पत्रकार परिषद होणार आहे, त्यात सविस्तर माहिती मिळेल. मतदार यादी एकमेकांवर ढकलून चालणार नाही, निवडणूक आयोगाने नैतिकता दाखवण्याची गरज आहे, असे सुप्रिया सुळे यांनी आज माध्यमांशी बोलताना सांगितले.तुम्हाला आठवत असेल, मी पहिल्या दिवसापासून विनंती करते की, सरसकट कर्जमाफी करा. शेतकऱ्याला दिलासा देऊ,अस सरकारने संगितल होत. शेतकऱ्यांची आज काय परिस्थिती आहे ते आपण बघतो आहे. सरकार कशाची वाट बघत आहे माहीत नाही, सरसकट कर्जमाफी झाली पाहिजे, असे सुप्रिया सुळे आज माध्यमांशी बोलताना म्हणाल्या.
मतदार यादी घोळाबद्दल बोलताना, रोज नव्या नावाची आणि शहराची यादी माहिती बाहेर आहे. ज्या निवडणूक आयोगावर सगळ्यांचा विश्वास होता त्याकडून अस होत आहे हे योग्य नाही. तसेच लखनऊ प्रकरणाबद्दल बोलताना, या बातमीची मी माहिती घेईल आणि मुख्यमंत्र्यांना पत्र देईल. सशक्त लोकतंत्र जिवंत ठेवण्यासाठी देशाच्या हितासाठी असेल तर गैर काय? महाविकास आघाडीचे मीटिंग होईल त्यात सगळं कळेल.
महाराष्ट्रात आणि पुण्यात गुन्हेगारी वाढली आहे. महिला अत्याचार, कोयता गँग सगळं वाढत आहे. महाराष्ट्राच्या पोलिसांचा अभिमान आहे. मात्र त्यांचा मागे जी अदृश शक्ती आहे त्याचा प्रॉब्लम आहे, असे म्हणत सरकारवर निशाणा साधला. आपण सगळ्यांना प्रोसेस माहिती आहेत. देशात पासपोर्ट द्यायचा अधिकार केंद्र सरकारला आहे. पासपोर्ट केंद्र सरकार देतो. मिनिस्ट्री ऑफ एक्सटर्नल अफेअर्स कोणाकडे आहे ते बघा. पासपोर्ट हा कागद नाही की, कोणी घेईल.
तर गोंदिया पालकमंत्री बाबासाहेब पाटील यांच्या राजीनाम्याबद्दल, सरकारचं अंतर्गत प्रश्न आहे, असे म्हणत एका वाक्यात उत्तर दिले. तसेच पवारांकडे यावर्षी दिवाळी साजरी होणार नाही, असेही सुप्रिया सुळे म्हणाल्या.
आज आम्ही बोलायला जात आहोत. शरद पवार आणि मी जाणार आहोत. भुजबळ वडिलांच्या वयाचे आहेत. त्यांनी आमच्याबरोबर काम केलं आहे. भुजबळ साहेब जियो हजारो साल. असे म्हणत त्यांना वाढदिवसाच्या शुभेच्छा दिल्या.

