1 minute reading time
(72 words)
[News State Maharashtra Goa]सुप्रिया सुळे धारावीच्या परिस्थितीवर काय बोलणार ?
धारावीमधील मशिदीचा अवैध्य भाग तोडण्यासाठी महापालिकेचे पथक शनिवारी धारावीत गेले होते. यावेळी पालिकेच्या पथकाला तेथील नागरिकांनी कारवाई करण्यापासून रोखले असून पालिकेच्या वाहनांवर दगडफेक देखील केल्याचे समोर आले आहे. धारावीमध्ये तणावपूर्ण परिस्थिती निर्माण झाली होती. या प्रकरणाविषयी सुप्रिया सुळे यांनी माध्यमांशी संवाद साधला आहे. राज्यात रोज गुन्हेगारीच्या घटना कशा घडतात, असा सवाल त्यांनी यावेळी उपस्थित केला आहे. तसेच भाजपा सत्तेत असल्यावरच राज्यात वाचाळवीर तयार होतात, अशी टीका देखील त्यांनी यावेळी केली आहे.

