[TV9 Marathi]मुख्यमंत्र्यांनी तातडीने Emergency जाहीर करावी, मिसिंग लिंकसदर्भात सर्व माहिती द्यावी
खरं तर मला विश्वासच बसत नाही कि ज्या 'मिसिंग लिंक' (Missing Link) प्रकल्पाचा इतका गांजावाजा करत कार्यक्रम झाला, ज्यामुळे अर्धा तास सगळ्यांचा वाचत होता, त्यामुळे सगळ्यांनीच त्याचे कौतुक केलं. सध्या कॉस्टमध्ये पडायला नको कारण तो वेगळा विषय आहे. मात्र ज्या पद्धतीने मिसिंग लिंकचे (Mumbai Pune Missing Link Land Slide) व्हिडीओ येतोय हे अतिशय चिंताजनक आहे. राज्यात या पूर्वीही पाऊस झाला आहे. मुंबई-पुण्याला पाऊस नवा नाही. पण असं चित्र पूर्वी नव्हतं. हे कदाचित पहिल्यांदाच पाहायला मिळत असून हे अतिशय चिंताजनक असल्याची प्रतिक्रिया राष्ट्रवादी शरद पवार पक्षाच्या खासदार सुप्रिया सुळे यांनी दिली आहे. महाराष्ट्राच्या मुख्यमंत्र्यांनी तातडीने आढावा घेऊन राज्यात आणीबाणी (Emergency) जाहीर करावी. महाराष्ट्राचे नेमकं चित्र काय? यावर देवेंद्र फडणवीस (Devendra Fadnavis) यांनी भाष्य करणं अतिशय आवश्यक असल्याचेही त्या म्हणाल्या.

