1 minute reading time (74 words)

[News State Maharashtra Goa]सुप्रिया सुळेंचा पत्रकारांशी संवाद

सुप्रिया सुळेंचा पत्रकारांशी संवाद

महायुती सरकारमध्ये सहभागी होण्यापूर्वी केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांच्या भेटीसाठी दिल्लीला दहा वेळा वेश बदलून गेलो होतो, असा गौप्यस्फोट उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी केल्यानंतर त्यांच्या भगिनी आणि राष्ट्रवादी काँग्रेस : शरदचंद्र पवार गटाच्या खासदार सुप्रिया सुळे यांनी विमानतळ प्रशासन, हवाई कंपनी आणि नागरी उड्डाण मंत्रालयाला धारेवर धरलं आहे. सुरक्षेत अशी चूक कशी होऊ शकते? आज अजित पवार नाव बदलून गेले, उद्या एखादा दहशतवादी अशाप्रकारे आल्यास जबाबदार कोण? असा सवाल सुप्रिया सुळे यांनी विचारला आहे. 

[ABP MAJHA]अजित पवार नाव बदलून विमानाने प्रवास करत...
[Maharashtra Times]सुप्रिया सुळे लाइव्ह