1 minute reading time
(101 words)
[Pudhari News]भुजबळ-पवार भेटीवर सुप्रिया सुळेंची पहिली प्रतिक्रिया, म्हणाल्या....
मराठा आणि ओबीसी आरक्षणाच्या (OBC Reservation) बैठकीच्या मुद्द्यावरुन कालच (रविवारी 14 जुलै) शरद पवार (Sharad Pawar) यांच्यावर गंभीर आरोप केल्यानंतर राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते आणि मंत्री छगन भुजबळ (Chhagan Bhujbal) हे आज(सोमवारी) सकाळी अचानकपणे शरद पवार यांच्या भेटीसाठी सिल्व्हर ओक (Silver oak) येथे दाखल झाले. छगन भुजबळ भेटीसाठी दाखल झाल्यानंतर राजकीय वर्तुळात चर्चेला उधाण आलं आहे. छगन भुजबळ अचानक शरद पवार यांना भेटायला का आले, याचे कारण अद्याप समोर आलेले नाही. त्यामुळे या भेटीबाबत अनेकांची उत्सुकता वाढली आहे. याबाबत खासदार सुप्रिया सुळे यांना प्रश्न विचारला असता हे मी तुमच्याकडूनच ऐकते असं त्यांनी म्हटलं आहे.

