[Sarkarnama]सुप्रिया सुळेंची मुख्यमंत्र्यांकडे मागणी
म्हणल्या,पुण्यातील प्रकरणात वैयक्तिक लक्ष घाला
पुणे महानगरपालिकेतील एका प्रश्नाबाबत खासदार सुप्रिया सुळे यांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना ट्वीटद्वारे एक मागणी केली आहे. सुळे त्यांनी सोशल मीडिया पोस्टद्वारे मुख्यमंत्र्यांनी या प्रकरणांमध्ये वैयक्तिक लक्ष घालावं असं म्हटलं आहे.
लोकसभा निवडणुकीमध्ये पुणे महापालिकेत नव्याने समाविष्ट झालेल्या 34 गावांच्या प्रश्नासंदर्भात मोठ्या प्रमाणात चर्चा झाली. आता हे समाविष्ट गावातील प्रश्न पुन्हा एकदा ऐरणीवर आले असून या संदर्भात सुप्रिया सुळे यांनी दखल घेत मुख्यमंत्री एकनाथ शिंदे(Eknath Shinde) यांच्याकडे हे प्रश्न तातडीने सोडवावी अशी मागणी केली
आहे..सोशल मीडियावरील पोस्टमध्ये सुप्रिया सुळे(Supriya Sule) म्हणाल्या की, 'पुणे महापालिका क्षेत्रात नव्याने समाविष्ट करण्यात आलेल्या 34 गावांत मिळकत करांबाबत काही त्रुटी आहेत. त्याबाबत नागरिकांनी विविध माध्यमांतून आपले म्हणणे वारंवार महापालिककडे मांडले आहे. परंतु अद्यापही ही त्रुटी दूर झाली नाही. त्याचबरोबर कर आकारणी करताना समाविष्ट गावांना ग्रामपंचायत कर आकारणीपेक्षा 9 ते 10 पट अधिक लावण्यात आली आहे..
याबाबत वारंवार पाठपुरावा करूनही त्यावर योग्य ती कार्यवाही झालेली नाही. उलट कर थकल्यामुळे महापालिका कारवाई करीत असल्याचे नागरीक सांगतात हे अतिशय चुकीचे आहे. कर रचनेतील त्रुटी दूर होण्यापूर्वीच कारवाई करणे हे अन्यायकारक आणि जनतेची लूट यामध्ये मोडणारे आहे. याबाबत जनतेत प्रचंड रोष आहे.' असंही सुळे म्हणाल्या आहेत.
तसेच 'महापालिका आयुक्तांनी याची तातडीने दखल घेऊन संबंधित कारवाया थांबवाव्या. या गावातील नागरीकांचे करांबाबतचे म्हणणे ऐकून घेऊन त्यावर तातडीने तोडगा काढायला हवा. परंतु हे होताना दिसत नाही. त्यामुळे मुख्यमंत्री महोदयांना माझी विनंती आहे की कृपया आपण या प्रकरणी वैयक्तिक लक्ष घालून हा विषय मार्गी लावावा.' अशी मागणी सुळे यांनी केली.
पुणे महापालिका क्षेत्रात नव्याने समाविष्ट करण्यात आलेल्या ३४ गावांत मिळकत करांबाबत काही त्रुटी आहेत. त्याबाबत नागरिकांनी विविध माध्यमांतून आपले म्हणणे वारंवार महापालिककडे मांडले आहे. परंतु अद्यापही ही त्रुटी दूर झाली नाही. त्याचबरोबर कर आकारणी करताना समाविष्ट गावांना ग्रामपंचायत…
— Supriya Sule (@supriya_sule) June 24, 2024

