[Civic Mirror]नाव न घेता सुप्रिया सुळेंचा हल्लाबोल ; पहा काय म्हणाल्या ?
एक वर्षांपूर्वी पक्ष कुठे होता, चिन्हं कुठे होतं? आमदार, खासदार कुठे होते आणि आज आम्ही कुठे आहोत. या साऱ्यासाठी महाराष्ट्रातील जनतेचे मी मनःपूर्वक आभार मानते. ज्यांची सत्तेची पद होती त्यातील काही लोकांनी आमचा पक्ष आणि चिन्ह घेऊन आमचे आयुष्य उध्वस्त केलं. मुलीचा वाढदिवस मी कोर्टात साजरा केला. मात्र, सत्य परेशान हो सकता है, मगर पराजित नहीं. मायबाप महाराष्ट्राच्या जनतेने जी साथ दिली, ती मायबाप जनतेच्या लक्षात आलं की आदरणीय पवार साहेब (Sharad Pawar) आणि उद्धव ठाकरे यांच्यावर अन्याय झाला आहे. अदृश्य शक्तीला असं वाटतं की अदृश्य शक्ती दिल्लीवरून काहीही करू शकते. मात्र, या राज्याने दाखवून दिलं की अदृश्य शक्ती इथे काहीही चालू शकत नाही. हा देश फक्त आणि फक्त भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकरांच्या संविधानाने चालत असल्याचे म्हणत राष्ट्रवादी शरद पवार गटाच्या खासदार सुप्रिया सुळेंनी (Supriya Sule) सरकारवर तोफ डागली आहे.

