1 minute reading time (90 words)

[LS Marathi]पुण्यातून खा. सुप्रिया सुळे

पुण्यातून खा. सुप्रिया सुळे

"राष्ट्रवादी काँग्रेस (शरद पवार) पक्षाचे प्रवक्ते विकास लवांडे यांना नुकतीच अटक करण्यात आली असून, या कारवाईवरून राजकीय वातावरण चांगलेच तापले. खासदार सुप्रिया सुळे यांनी या अटकेचा तीव्र शब्दांत निषेध केला असून, राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यावर निशाणा साधला. पुण्यातील गुन्हेगारीचा आलेख वेगाने वर सरकत आहे, जनता दहशतीच्या छायेखाली आहे. मात्र, गृहमंत्रालय सुस्त आहे. एकीकडे गुन्हेगारांना हँड द्यायचा आणि दुसरीकडे लवांडे यांच्यासारख्या राजकीय कार्यकर्त्यांना सूड भावनेतून अटक करायची, ही कुठली पद्धत आहे? असा सवाल त्यांनी उपस्थित केला.विकास लवांडे यांच्या अटकेनंतर सुप्रिया सुळे यांनी सोशल मीडियाच्या माध्यमातून आपला संताप व्यक्त केला.

[Asianet News Marathi]खासदार सुप्रिया सुळे पुणे पो...
[News18 Marathi]'पुण्यात कुणालाही वर्दीची भीती राह...