[Zee 24 Taas]भोंदू बाबा अशोक खरात प्रकरणावरून सुप्रिया सुळे आक्रमक; काय म्हणाल्या?
राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाच्या खासदार सुप्रिया सुळे आज पुणे दौरावर होत्या. या पुणे दौऱ्यादरम्यान त्यांनी राज्य आणि देशपातळीवरील विविध मुद्द्यांनवर भाष्य केले. यावेळी बोलताना त्यांनी दिल्लीत गेल्या काही दिवसांमध्ये त्यांच्याबाबत घडलेला किस्सा सांगितला..नाशिकमधील भोंदू बाबा खरातप्रकरण आणि नव्याने नुकतेच समोर आलेले लवजिहाद प्रकरणाबाबत सुप्रिया सुळे यांना पत्रकारांनी विचारले असता सुप्रिया सुळे म्हणाल्या, नाशिक हा अत्यंत सुसंस्कृत असा जिल्हा आहे. कष्टकरी शेतकऱ्यांचा जिल्हा म्हणून नाशिकला ओळखलं जातं. मात्र ही दुर्दैवाची गोष्ट आहे की गेल्या काही दिवसांपासून काही लोकांमुळे या जिल्ह्याची सातत्याने बदनामी होत आहे..भोंदूबाबा खरातमुळे फक्त नाशिकचीच नाही तर सबंध महाराष्ट्राची बदनामी झाली आहे. दिल्लीमध्ये जेव्हा जेव्हा मी पार्लमेंटसाठी गेले. तेव्हा प्रत्येकानं भोंदूबाबा खरातबद्दल विचारून माझी चेष्टा केलीय. ते विचारतात अरे सुप्रिया तुम्हारे महाराष्ट्र में क्या हो रहा है. त्यावेळी मला फार वाईट वाटलं.

