1 minute reading time (88 words)

[Civic Mirror]भाववाढीवरून सुप्रिया सुळेंचा केंद्र सरकारवर हल्लाबोल

भाववाढीवरून सुप्रिया सुळेंचा केंद्र सरकारवर हल्लाबोल

देशातील वाढती महागाई, इंधन दरवाढ आणि दुधाच्या किमतीत झालेली मोठी वाढ यावरून राष्ट्रवादी काँग्रेस (शरदचंद्र पवार) पक्षाच्या नेत्या आणि खासदार सुप्रिया सुळे यांनी केंद्र आणि राज्य सरकारवर जोरदार हल्लाबोल केला आहे. "या देशात आता सामान्य माणसासाठी स्वस्त काय राहिलंय? दुधाचे भाव वाढलेत, इंधनाचे भाव वाढलेत; सरकारने सर्वसामान्यांचे जगणे कठीण करून ठेवले आहे," अशा शब्दांत सुप्रिया सुळे यांनी आपला तीव्र संताप व्यक्त केला.गेल्या काही दिवसांत दुधाच्या दरात प्रतिलिटर झालेली वाढ आणि आंतरराष्ट्रीय घडामोडींच्या पार्श्वभूमीवर इंधनाच्या किमतीत सातत्याने होणारी दरवाढ यावर सुप्रिया सुळे यांनी माध्यमांशी बोलताना सरकारला धारेवर धरले.

[Lokmat]गुन्हेगारांना फ्री हँड अन् कार्यकर्त्यांना...
[Asianet News Marathi]खासदार सुप्रिया सुळे पुणे पो...