1 minute reading time
(79 words)
[Saam TV]आरक्षणाच्या बैठकीवरून सुप्रिया सुळेंचा भुजबळांवर हल्लाबोल
आरक्षणाच्या आडून महाराष्ट्र पेटवण्याचं काम काही लोक करत आहेत, असा गंभीर आरोप अजित पवार गटाचे नेते छगन भुजबळ (Chhagan Bhujbal) यांनी शरद पवार यांच्यावर केला आहे. त्यांच्या या आरोपांनी राज्यभरात एकच खळबळ उडाली आहे. अजित पवार, रुपाली चाकणकर, सुनील तटकरे यांच्या उपस्थितीत राष्ट्रवादी काँग्रेसचा बारामतीत मेळावा आयोजित करण्यात आला होता. याच कार्यक्रमात भुजबळ यांनी हे विधान केलंय. त्यांच्या या आरोपांना आता शरद पवार यांच्या कन्या तथा खासदार सुप्रिया सुळे (Supriya Sule) यांनी जशास तसं प्रत्युत्तर दिलंय.

