3 minutes reading time (546 words)

[TV9 Marathi]अजित पवार काय बोलले ते खोडून काढायचं पाप काही लोकांनी केले, सुप्रिया सुळे यांचा मोठा आरोप, थेट..

अजित पवार काय बोलले ते खोडून काढायचं पाप काही लोकांनी केले, सुप्रिया सुळे यांचा मोठा आरोप, थेट..

विधान परिषदेच्या निवडणुकीच्य पार्श्वभूमीवर सुप्रिया सुळे काँग्रेस भवनात बैठकीसाठी पोहोचल्या. पुण्यातून पवारांच्या पक्षाकडून उमेदवार निवडणुकीच्या रिंगणात आहेत. यादरम्यान सुप्रिया सुळे काँग्रेस भवनात पोहोचल्या. पत्रकारांसोबत संवाद साधताना सुप्रिया सुळे यांनी सरकारवर जोरदार टीका केली. सुप्रिया सुळे यांनी म्हटले की, गेल्या काही दिवसांपासून पुण्यात गुन्हेगारी मोठ्या प्रमाणात वाढतंय. यावर आम्ही सातत्याने महाविकास आघाडी म्हणून नाही तर पुण्यावर प्रेम करणारे पुणेकर म्हणून आम्ही प्रश्न मांडतो. राजकारण होत राहिल, निवडणुका होत राहतील. पण आम्ही सर्व लोक पुण्याची आहोत. आम्ही पुणेकर आहोत. या पुण्याने आम्हा सर्वांना किती दिलेले आहे. आमची नैतिक जबाबदारी नाही जर गुन्हेगारी वाढत असेल तर. आपल्या सगळ्यांच्या घरात लहान मुले, लेकी, सूना नाहीत?

मग लढायचं नाही त्याच्यासाठी? मला गमंत या गोष्टीची वाटते की, राज्य सरकारचा स्थानिक गुन्हेगारीचा डेटा आणि केंद्र सरकारचा डेटा यात तफावत आहे. म्हणजे अमित शहा यांच्या विभागाचा डेटा आणि महाराष्ट्र सरकारचा डेटा आणि पुणे शहराचा डेटा हे तिन्ही वेगवेगळे डेटा आलेले आहेत. यामुळे कुठल्या डेटा खरा हा एक प्रश्न आहे. पण त्याचबरोबर पुणे शहरात सर्व चॅनलवर आणि पेपरवर एक दिवस आड किंवा कदाचित रोजही असेल कुठली ना कुठली घटना दुर्देवी घटना ही पुण्यात होते.

मला आर्श्चय वाटतंय की, एवढे सर्व व्हिडीओ चॅनलवर चालत असताना पुण्याच्या पोलिस यंत्रणेला ते कसे दिसत नाहीत. किंवा ते टीव्हीच बघत नाहीत, हा प्रश्न पडतो. पुण्यात अनेक प्रश्न प्रलंबित आहेत. प्रचंड भ्रष्टाचार, महागाई, बेरोजगारी या सरकारमध्ये आहे. अनेक लोकांनी पक्ष बदले आणि त्यांचे आरोप वॉशिंग मशीन मध्ये धुवून निघाले. उशिरा झालेला पाऊस पाण्याचे प्रश्न,कचरा अनेक प्रश्नांवरती चर्चा झाली. दर महिन्याला आम्ही बैठक घेणार आहोत.

पुढे सुप्रिया सुळे यांनी म्हटले की, या निवडणुकी संदर्भात काही चर्चा झाली नाही. महाविकास आघाडीमध्ये एकत्र लढण्याचा निर्णय आम्ही घेतलेला आहे. स्थानिक मुद्द्यावरती चर्चा झाली. पुण्यामध्ये सातत्याने गुन्हेगारी वाढत आहे. पोलीस आयुक्तांनी हे पत्र त्यांनी मला देण्यापेक्षा देवेंद्र फडणवीस आणि अमित शहा यांना द्यायला पाहिजे. कोयता गॅंग जेव्हा अटॅक करते तेव्हा त्याचे व्हिडिओ तुम्ही दाखवता. पुण्याचे कारभारी यांना सर्व बातम्या मी पाठवणार आहे.

पुण्यातला क्राईम पहिला विषय आहे. आमची सहकार्याची भूमिका आहे पोलिसांसाठी. आमच्या राज्याची आणि शहराची बदनामी होत आहे. पोलीस आयुक्तांनी पत्र लिहिले त्याबद्दल मी त्यांचे आभार मानते. आम्ही सेवक आहोत. त्यांना जर आमचं सहकार्य हवे असेल तर त्यांनी आम्हाला मिटींगला बोलवावं आमची सहकार्याची भूमिका आहे. जो बदलीचा विषय आला आहे.. याची नोंद महाराष्ट्राच्या गृहमंत्र्यांनी घ्यावी. अजित पवार गटाचे जे कॅंडिडेट आहेत त्यांनी जो फॉर्म भरला आहे. त्यांनी टॅक्स भरलेला नाही असं ऑब्जेक्शन आलं आहे. निवडणूक आयोग त्याचे उत्तर देऊ शकेल. काही लोकांचे अश्रूही मी तीन वरती पाहिले त्यांच्या गटाच्या निर्णयांमध्ये पडण्याचा माझा अधिकार नाही.

माणुसकीच्या नात्याने एक गोष्ट नक्कीच म्हणेल प्रत्येक पक्षाने कार्यकर्त्यांना काय द्यायचं हा त्यांचा अंतर्गत प्रश्न आहे.. ज्या लोकांनी पक्षासाठी योगदान दिलं आहे. त्यांना उमेदवारी दिली नाही. अजित पवार असते तर खूप गोष्टी वेगळ्या असत्या. अजित पवार काय बोलले होते ते खोडुन काढायचं पाप काही लोकांनी केलं. विचारल्याशिवाय मी कोणाला मार्गदर्शन करत नाही. संजय काकडे ना मी फारसं ओळखत नाही. कोणाला तिकीट द्याव हे त्यांच्या गटाचा प्रश्न आहे.


...

अजित पवार काय बोलले ते खोडून काढायचं पाप काही लोकांनी केले, सुप्रिया सुळे यांचा मोठा आरोप, थेट.. - Marathi News | MP Supriya Sule criticizes the government on the issue of increased crime in Pune | TV9 Marathi

खासदार सुप्रिया सुळे यांनी नुकताच सरकारवर टीका केली. पुण्यातील वाढती गुन्हेगारी यावरून त्यांनी सरकावर निशाणा साधला. पुण्यातला क्राईम पहिला विषय आहे. आमची सहकार्याची भूमिका आहे पोलिसांसाठी. आमच्या राज्याची आणि शहराची बदनामी होत आहे.
[Sakal]MP Supriya Sule : ‘नरेटिव्ह’ पसरवणाऱ्यांवर ...
[ETV Bharat]"इलेक्ट्रॉनिक भ्रष्टाचार म्हणायचं की ब...