2 minutes reading time (491 words)

[ABP MAJHA]रिश्ते ही मायने रखते है! पैसा, सत्ता यापेक्षा कुटुंब महत्त्वाचे;

रिश्ते ही मायने रखते है! पैसा, सत्ता यापेक्षा कुटुंब महत्त्वाचे;

सुनेत्रा पवारांच्या प्रचाराला बोलविल्यास जाणार का? सुप्रिया सुळे म्हणाल्या...

बारामती: बारामतीच्या पोटनिवडणुकीत (Baramati Byelection 2026) माझा रोल मतदानाला जाण्याचा आहे. शेवटी रिश्तेही मायने रखते है. सुनेत्रा पवारांच्या प्रचाराला जाणार का? या प्रश्नावर उत्तर देताना हा प्रश्न त्यांनी विचारायला हवा असे सांगत अजित पवार गटाकडून बोलावणे आल्यास बारामतीत (Baramati Byelection 2026) सुनेत्रा वहिनींचा प्रचार करण्याचे थेट संकेत सुप्रिया सुळे (Supriya Sule) यांनी दिले आहे. तुम्ही हा प्रश्न अजित पवार गटाच्या वतीने विचारत असाल तर त्याचे उत्तर माझ्याकडे तयार असल्याचेही त्यांनी यावेळी म्हटले आहे.

तर बारामतीची पोटनिवडणूक (Baramati Byelection 2026) बिनविरोध का झाली नाही याबाबतचे उत्तर तुम्ही अजित पवार गटालाच विचारा कारण यासाठीची सर्व मॅनेजमेंट तेच पाहत होते, असे सांगत बिनविरोध निवडणूक पूर्ण होण्यामागे अजित पवार गटाचे अपयश असल्याचे संकेतही त्यांनी दिले. काल दिवसभर मी बारामतीत नव्हते त्यामुळे नेमके काय घडले याची मला माहिती नाही पण निवडणूक काळात निवडणूक लढविण्यास कार्यकर्ते उत्सुक असतात असे सांगत सुप्रिया सुळे यांनी प्रश्नाला बगल दिली. पैसा सत्ता यापेक्षा कुटुंब महत्त्वाचे असते त्यामुळेच मी नेहमी सांगते, 'रिश्ते मायने रखते है' त्यामुळे संपूर्ण कुटुंब सुनेत्रा वहिनींच्या पाठीशी असल्याचेही त्यांनी सांगितले. आज विठ्ठल दर्शनासाठी आले असता सुप्रिया सुळे माध्यमांशी बोलत होत्या. 

Baramati Byelection 2026: बारामती आणि राहुरीचा पोटनिवडणूक कार्यक्रम

निवडणुकीची अधिसूचना जारी : 30 मार्च 2026
उमेदवारी अर्ज दाखल करण्याची मुदत : 6 एप्रिल 2026
अर्जांची छाननी : 7 एप्रिल 2026
अर्ज मागे घेण्याची मुदत : 9 एप्रिल 2026
मतदानाची तारीख : 23 एप्रिल 2026
मतमोजणी : 4 मे 2026
निवडणूक प्रक्रिया पूर्ण करण्याची तारीख : 6 मे 2026

Baramati Byelection 2026: 30 उमेदवारांनी अर्ज मागे घेतले

बारामती पोटनिवडणुकीसाठी उमेदवारी अर्ज मागे घेण्याच्या शेवटच्या दिवशी 30 उमेदवारांनी आपले अर्ज माघारी घेतले आहेत. शेवटच्या दिवशी अर्ज माघारी घेण्याची वेळ संपली आहे. तत्पूर्वी, काँग्रेस उमेदवार आकाश मोरे यांनीही आपला अर्ज माघारी घेतला. त्यामुळे, बारामती विधानसभा मतदारसंघातील अर्ज दाखल केलेल्या 53 पैकी एकूण 30 उमेदवारांनी आपले अर्ज मागे घेतले आहेत. मात्र, बिग बॉस फेम अभिजीत बिचुकले आणि करुणा मुंडे- शर्मा यांचा अर्ज कायम आहेत. त्यामुळे, बारामती पोटनिवडणुकी एकूण 23 जण निवडणुकीच्या रिंगणात आहेत. दरम्यान, गुरुवारी सहा जणांनी उमेदवारी अर्ज मागे घेतले होते, त्यानंतर आज 24 उमेदवारांनी अर्ज माघारी घेतले आहेत. त्यामुळे, एकूण, 30 उमेदवारांनी अर्ज माघारी घेतले.

दरम्यान, बारामती पोटनिवडणुकीसाठी अभिजीत बिचुकले यांनी उमेदवारी अर्ज दाखल केला होता, तसेच करुणा शर्मा यांनी देखील अर्ज भरला होता. त्यामुळे, काँग्रेसने माघार घेतल्यानंतर या दोघांच्या अर्जाकडे सर्वांचे लक्ष लागले होते. मात्र, अर्ज माघारी घेण्याच्या शेवटच्या दिवशी दोघेही बारामतीत फिरकलेच नाहीत. त्यामुळे, त्यांचे अर्ज कायम राहिले असून आता, पोटनिवडणुकीसाठी मतदान होणार असल्याचं निश्चित झालं आहे. बारामतीत 23 एप्रिल रोजी मतदान प्रक्रिया पार पडणार आहे.  

...

Supriya Sule on Baramati Byelection 2026: रिश्ते ही मायने रखते है! पैसा, सत्ता यापेक्षा कुटुंब महत्त्वाचे; सुनेत्रा पवारांच्या प्रचाराला बोलविल्यास जाणार का? सुप्रिया सुळे म्हणाल्या... | if they invited Will go to Sunetra Pawar Baramati Election 2026 campaign on this question Supriya Sule answer

Supriya Sule on Baramati Byelection 2026: पैसा सत्ता यापेक्षा कुटुंब महत्त्वाचे असते त्यामुळेच मी नेहमी सांगते, 'रिश्ते मायने रखते है' त्यामुळे संपूर्ण कुटुंब सुनेत्रा वहिनींच्या पाठीशी असल्याचेही त्यांनी सांगितले.
[Navarashtra]‘आत्या म्हणून जे सांगायचे ते घरात सां...
[ETV Bharat]रोहितने मोठा भाऊ म्हणून दिलगिरी व्यक्त...