1 minute reading time (98 words)

[My Mahanagar]कारमध्ये बसवलं आणि..., बोपदेव घाटत रात्री 11 वाजता काय घडलं ?

कारमध्ये बसवलं आणि..., बोपदेव घाटत रात्री 11 वाजता काय घडलं ?

 पुण्यात दिवसेंदिवस महिला अत्याचार, खून, गुन्हेगारी या घटना मोठ्या प्रमाणावर वाढताना दिसत आहेत. अशातच काल (गुरूवारी) दोन चिमुकल्या मुलींवर स्कुलबस चालकाने लैंगिक अत्याचार केल्याची घटना समोर आली, या घटनेचा संताप नागरिक, पालक व्यक्त करत असतानाच शहर परिसरात पुन्हा एक सामूहिक बलात्काराची घटना उघडकीस आली आहे. आपल्या मित्रासोबत फिरायला गेलेल्या एका तरूणीवर तिघांनी सामूहिक अत्याचार केल्याची संतापजनक घटना समोर आली. पुण्यातील बोपदेव घाटातून तरूणीचे अपहरण करून तिला येवलेवाडी परीसरात घेऊन जाऊन तिच्यावर गँगरेप करण्यात आल्याचा हा भयानक प्रकार आहे. पीडित महिलेवर सध्या रुग्णालयात उपचार सुरू आहेत. या घटनेबाबत नागरिकांसह आता राजकीय नेते देखील संताप व्यक्त करताना दिसत आहेत.

[Saam TV]राज्यातील हवा आता बदललेय
[Primetime Marathi]हर्षवर्धन पाटलांना उमेदवारी दिल...