[Saam TV]वाडिया कॉलेजबाहेर काँग्रेसचं आंदोलन लाईव्ह
"देशभरातून लोकं त्यांच्या मुलं-मुलींना पुण्यात शिक्षणासाठी पाठवतात. पुण्याला चांगलं शहर म्हणून ओळख आहे. ही घटना झालीच कशी? याचा फॉलोअप आम्ही करणारं आहोत. सरकार लाडकी बहीण म्हणून 1500 रुपये देतात, पण आज अनेक महिला म्हणतायत आम्हला 1500 नको. आमच्या मुली सुरक्षित ठेवा. याआधी आंदोलन करून सुद्धा कारवाई झाली नव्हती. म्हणून हे परत आंदोलन करतोय" असं सुप्रिया सुळे म्हणाल्या. पुण्यात महाविद्यालयीन विद्यार्थिनीवर झालेल्या सामूहिक अत्याचाराविरोधात विद्यार्थ्यांनी वाडिया विद्यालयाच्या गेटसमोर आंदोलन केलं. त्यात खासदार सुप्रिया सुळे सहभागी झाल्या होत्या. महाविद्यालयीन विद्यार्थिनीवर झालेल्या सामूहिक अत्याचाराविरोधात पुण्यातील वाडिया विद्यालयाच्या गेटसमोर विद्यार्थ्यांनी आंदोलन केलं. पुण्यात सोशल मीडियावरून झालेल्या ओळखीतून चार जणांनी महाविद्यालयीन विद्यार्थीनीवर अत्याचार केल्याची घटना घडली आहे.

