1 minute reading time
(89 words)
[TV9 Marathi]अपघात झालेल्या MPSC च्या विद्यार्थ्यांना आणखी एक संधी देणं आवश्यक, सुळेंचं ट्वीट
पुण्यात भावे हायस्कूलजवळ 31 मे रोजी सायंकाळी भीषण अपघात झाला. भर धाव कारनं टपरीवर चहा पिणाऱ्या 12 विद्यार्थ्यांना उडवलं. हे 12 विद्यार्थी एमपीएससीचे असल्याची माहिती आहे. जखमीपैकी तिघांची प्रकृती गंभीर आहे. जखमींवर संचेती आणि मोडक रुग्णालयामध्ये उपचार सुरु आहेत. जखमी विद्यार्थ्यांपैकी काही विद्यार्थ्यांची 1 जून रोजी परीक्षा होती. अपघातात चारजणांचे पाय मोडले तर एका युवतीच्या कमरेला गंभीर दुखापत झाल्याची माहिती समोर आली आहे. दरम्यान कार चालकाला पोलिसांनी ताब्यात घेतलं असून मद्यप्रशान करून तो गाडी चालवत असल्याची माहिती मिळाली आहे. या प्रकरणाबाबत खासदार सुप्रिया सुळे यांनी भावना व्यक्त केल्या आहेत.

